33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने संताप

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने संताप

टीम लय भारी

बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला.  काल रात्री अश्वारूढ पुतळा काढण्यात आल्याने मराठी भाषिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. कन्नाडीगांच्या दबावामुळे हे कृत्य केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी हे एकीकरण लढ्याचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. निपाणीपासून जवळ असलेल्या मनगुत्ती गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता, त्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. या पुतळ्यासाठी चौथऱ्याचे काम पूर्ण झाले होते. व त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तो काढून टाकावा असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्याला विरोध करण्यासाठी मनगुत्ती येथील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर मोठ्या बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी रातोरात या ठिकाणी येऊन हा पुतळा हटवला. त्यानंतर सीमा भागातून कन्नाडीगांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा पुतळा बसवण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका सीमाभागातील समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवभक्तांमध्ये एकच संताप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण…

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी