30 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरात सोलापूरसाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकणार

बाळासाहेब थोरात सोलापूरसाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकणार

टीम लय भारी

सोलापूर : ‘कोरोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नाही. लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करून आक्रमक रणनिती तयार करा, अन् कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांचा शोध घ्या अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सोलापूरच्या जिल्हा प्रशासनास दिल्या ( Balasaheb Thorat instructed to Solapur administration ).

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात यांनी कोरोना निर्मूलनासाठी महत्वाच्या सुचना केल्या

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, लॉकडाऊन हा पर्याय नाही ( Balasaheb Thorat said, Lockdown isn’t solution for Corona ). आक्रमक रणनिती बनवून ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देऊन कोरोना संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. भाजी मार्केट, दुकांनामध्ये लोक गर्दी करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेते गेलेले माजी मंत्री राष्ट्रवादीत परतण्यासाठी आतूर

उद्धव ठाकरेंच्या पुढे फायलींचा ढीग, फायलींना मंजुरी मिळत नसल्याने काँग्रेस – राष्ट्रवादीचे मंत्री हवालदील

अमृता फडणवीसांना संतप्त पोलीस अधिकाऱ्याचे पत्र

राजेश टोपेंचा खासगी रूग्णालयांना दणका, मनमानी शुल्क आकारणीला चाप लावण्यासाठी भरारी पथके

सहकारच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या, खोके – पेट्यांची जोरदार चर्चा

लग्न कार्यात नियमांपेक्षा जास्त लोक जमल्याने गर्दी होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. कोरोनाबाबत लोकजागृती आणि लोकशिक्षणावर भर द्यावा. सोलापूर हा विडी कामगारांचा जिल्हा आहे.  विडी कामगार माता भगिनींची विशेष काळजी घ्या. आता कोरोना जगण्याची संस्कृती उभी करावी लागेल. पुढच्या १०० दिवसांचे नियोजन करून अर्थव्यवस्था कार्यान्वित करा अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

यावेळी त्यांनी कोरोना यौद्ध्यांच्या कार्याचे कौतुकही केले. सोलापूरमध्ये ५०० खाटांचे कोविड रूग्णालय उभारण्याबाबत आपण मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाशी चर्चा करून पाठपुरावा करू असे सांगून आपण सर्वजण मिळून लोकांच्या साथीने कोरोनाला हरवू असा विश्वास महसूलमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Mahavikas Aghadi

 या बैठकीत बोलताना महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘कोरोना’ला सहज घेऊ नका. ग्रामीण भागात जास्त रूग्णसंख्या असलेल्या भागात आणखी ट्रेसिंग आणि ट्रेसिंग वाढवा. मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोना बधितांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करा.

विडी कामगार महिलांची अडचण होणार नाही. त्यांना रेशनिंगचे अन्नधान्य मिळेल याची काळजी घ्या अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत काही तक्रारी आहेत. मात्र सरकार या सेविकांच्या पाठीशी आहे. मागील महिन्यांपर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे असे ठाकूर म्हणाल्या.

lay bhari

या बैठकीत बोलताना पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले की, सोलापूर प्रशासनाने चांगले काम केले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शहरालगतच्या भागात रूग्णसंख्या वाढत आहे. त्यासंदर्भाने काळजी घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात शहरात येत असल्याने शहरातील हॉस्पिटलवर ताण वाढतो आहे. त्यामुळे आम्हाला ५०० बेडचे हॉस्पिटल शहरात निर्माण करायचे आहे तसा प्रस्ताव बनवला आहे, त्याला आपण पाठबळ द्यावे अशी मागणी पालमंत्र्यांनी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी