34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवारांनी अजित पवारांना फटकारले

शरद पवारांनी अजित पवारांना फटकारले

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवारांनी ट्विटवरून नस्ती उठाठेव केल्यानंतर शरद पवार यांनी अजितदादांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. अजित पवारांचा दावा खोडून काढणारे ट्विट शरद पवारांनी लगेचच केले आहे. अजितदादांच्या ट्विटनंतर त्याला प्रत्युत्तर देणारे ट्विट शरद पवार यांनी काही मिनिटांतच केले आहे.

‘भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उपस्थित राहात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने एकमताने शिवसेना व काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांमध्ये संभ्रम व चुकीचा दृष्टीकोन तयार करणारा श्री. अजित पवार यांचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे’, अशा कडक शब्दांत शरद पवार यांनी कानपचिक्या दिल्या आहेत.

‘मी राष्ट्रवादीतच आहे. शरद पवार हेच आपले नेते आहेत, आणि भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात पाच वर्षे स्थिर राहील,’ असे ट्विट अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. परंतु शरद पवार यांनी अजितदादांचा दावा खोडून त्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. लोकांमधील संभ्रम दूर व्हावा याची काळजी शरद पवार यांनी घेतलेली दिसत आहे.

शरद पवारांचा संदेश : फडणवीसांचे सरकार पाडायचे

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांसोबत बैठक घेतली. आमदारांना त्यांनी सुस्पष्ट शब्दांत मार्गदर्शन केले आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचेच सरकार आपण स्थापन करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरेसे आमदार नाहीत. त्यामुळे विधानसभेमध्ये बहुमताची चाचणी घेताना हे सरकार आपल्याला पाडायचे आहे, असे मार्गदर्शन शरद पवार यांनी सगळ्या आमदारांना केले असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.

अजित पवार घेणार पत्रकार परिषद

अजित पवार व शरद यांच्यात ट्विट रंगल्यानंतर आता अजितदादांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी ते पत्रकार परिषद घेणार आहे. आपली उघड भूमिका ते पत्रकार परिषदेतून मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजितदादांचा आमदारांना फोन

अजितदादांनी आम्हाला फोन केला होता. परंतु आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत, असे या आमदारांनी शरद पवारांना सांगितल्याचे समजते.

धनंजय मुंडेंसोबत शरद पवारांची चर्चा

धनंजय मुंडे परत आले आहेत. परंतु त्यांच्या भूमिकेविषयी अद्यापही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. अजितदादांनी भाजपसोबत घरोबा केला तेव्हा त्यांच्या बरोबर धनंजय मुंडेही नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे अजूनही धनंजय मुंडे यांच्या अंतर्मनात अजूनही अजितदादांनाच पाठिंबा द्यायचा विचार आहे की काय असे चित्र आहे. त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी वेगळी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासोबत एकांतात चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

ट्विटमधून जयंत पाटलांचे अजितदादांना भावनिक आवाहन

अजितदादा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या, असे भावनिक आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते

पुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी