31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयIAS Transfer : मुख्यमंत्र्यांनी केल्या १५ IAS अधिका-यांच्या बदल्या

IAS Transfer : मुख्यमंत्र्यांनी केल्या १५ IAS अधिका-यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज १५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या (IAS Transfer) केल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे यांच्यासह अन्य १५ सनदी अधिका-यांच्या बदल्या (IAS Transfer) झाल्या आहेत.

राज्यात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दौ-यावर मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्री असतानाच १५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात असून मंत्रालयात चर्चांना उत आला आहे.

सनदी अधिकारी प्रविण दराडे, IAS (1998), यांची समाज कल्याण आयुक्त पदावरून बदली केल्यानंतर मधल्या काळात कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती. आता त्यांच्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी पल्लवी दराडे, IAS (1997), यांची गृह खात्याचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे सुरक्षा आणि अपील हा विभाग देण्यात आला आहे.

तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या जयश्री भोज, IAS (2003), यांना आयटी विभागाच्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

ए. आर. काळे, IAS (2005), यांची बदली फूड अॅण्ड ड्रग्ज विभागाच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अश्विनी जोशी, IAS (2006), यांची एमपीसीएल च्या व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

डॉ. एम. एस. कलशेट्टी, IAS (2007), यांची नियुक्ती भूजल सर्व्हेक्षण विभाग पुणे येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आर. बी. भोसले, IAS (2008), यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावरून अहमदनगरच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.

एच. पी. तुम्मोड, IAS (2008), यांची डेरी विकासच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. के. एच. कुलकर्णी, IAS (2009) यांची मुंबई महापालिका प्रशासन विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सी. के. डांगे, IAS (2010), यांची एड्स कंट्रोलच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

एम. बी. वारभुवन, IAS (2010) , यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. येथील डॉ. सुधाकर शिंदे, IAS (2007), यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात उपसचिव पदावर करण्यात आली आहे.

आर. एस. क्षीरसागर यांची कोकण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

बी. बी. दांगडे यांची रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष पदावरून शुल्क प्राधिकरण समितीच्या सचिव पदी करण्यात आली आहे.

तसेच आर. के. गावडे यांची नाशिक उपायुक्त पदावरून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी