29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमंत्रालयसात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाण्याचे नवे आयुक्त

सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, विजय सिंघल ठाण्याचे नवे आयुक्त

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्तपदी विजय सिंघल व नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

(1) श्री रणजित कुमार यांची नियुक्ती संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई या पदावर

(2) श्री एमजी अर्दड यांची नियुक्ती आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद या रिक्त पदावर

(3) श्री विजय सिंघल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे या पदावर

(4) श्री एल. एस. माळी यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई या रिक्त पदावर

(5) श्री. अभिजीत बांगर यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर या रिक्त पदावर

(6) श्री. यु. ए. जाधव यांच्या आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई या रिक्त पदावर

(7) श्री मदन नागरगोजे संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई, यांची नियुक्ती सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्टिटर अकाऊंट फॉलो करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी