व्हिडीओ

VIDEO : पक्षी v आकाराच्या थव्याने का उडतात ?

निळ्याशार आकाशात अनेकदा आपण पक्ष्यांचे ठावे उडताना पाहिले असतील त्यांचे ते थव्याने उडणे पाहताना अनेकदा भान हरपायला होते इतके हे दृश्य विलोभनीय असते . पण त्यांचे उडणे पाहताना आपण एक गोष्ट नेहमीच पाहिली असेल आणि ती म्हणजे पक्षांचे हे थवे उडत असतना इंग्रजीतल्या V आकारात उडतात … असे का बरे असेल ? हा प्रश्न  तुम्हांलाही पडला असेल तर आज आपण त्याचेच उत्तर या भागात जाणून घेणार आहोत
पक्षी V आकाराच्या थव्यातच उडताना आपण अनेक्दा पाहिले असतील मात्र सगळेच पक्ष्यांचे थवे हे वी आकारात उडत नाहीत . तर काही स्थलांतर करणारे पक्षीच अश्या पद्धतीने उड्डाण करतात लांबीचे अंतर पार करणारे स्थलांतरीत पक्षीच V आकाराच्या थव्यांमध्ये उडत असतात तर कमीत कमी उर्जा वापरून उड्डाणाचे जास्तीत जास्त अंतर कापता यावे पार करता यावे यासाठी पक्षी ही युक्ती वापरतात आपण जहाज चालताना पाहिले असेल. जहाज जेव्हा पुढे जात असते तेव्हा त्याच्या मागील बाजूचे पाणी हे खालच्या बाजूला दाबले जाते आणि बाजूचे पाणी हे वर उसळते. अश्याच पद्धतीने पक्षी जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा अगदी असेच काहीसे घडत असते .
जसजसे पक्षी उडताना ते पुढे जातात, तसतशी त्यांच्या पाठमागची हवा खाली दाबली जाते आणि बाजूची हवा वर जाते. आणि ही वर आलेली हवा दुसऱ्या पक्षांसाठी एकप्रकारे इंधनाचेच म्हणजेच उर्जेचे काम करते. पक्षांना हवेत राहण्यासाठी ऊर्जा लागते. दुसऱ्या पक्ष्याच्या उडण्यामुळे बाजूने वर येणारी हवा इतर पक्ष्यांना वर हवेत तरंगत ठेवण्यासाठी अतिरिक्त उर्जा म्हणून मदत करते. त्यामुळे पक्षांची ऊर्जा वाचते. म्हणूनच आपली ऊर्जा वाचवण्यासाठी दुसरे पक्षी उडणाऱ्या पक्ष्याच्या बाजूने उडतात आणि एक एक पक्षी त्याचे अनुकरण करत त्यांच्या उडणाऱ्या थव्याला V आकार प्राप्त होतो.वैज्ञानिक भाषेत या पद्धतीला बर्बल असे म्हटले जाते .

हे सुद्धा पहा :  Azadi ka Amrit Mahotsav:’आजादी का अमृत महोत्सव’ : पतंगबाजीमुळे शेकडो पक्षी घायाळ 

        उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; भाजपला चपराक, तर अशोक चव्हाणांवर टाकला विश्वास

                NASA : अरे बापरे ! नासा लवकरच मानवी पुतळे चंद्रावर पाठवणार

टीम लय भारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

7 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

7 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

9 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

10 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

11 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

11 hours ago