32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; भाजपला चपराक, तर अशोक चव्हाणांवर...

उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी; भाजपला चपराक, तर अशोक चव्हाणांवर टाकला विश्वास

टीम लय भारी

मुंबई : मराठा आरक्षणविषयक उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी भाजपकडून वारंवार होत आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली नाहीच, उलट अशोक चव्हाण यांच्यावर अतिरिक्त जबाबदारीही सोपविली आहे ( Uddhav Thackeray given additional responsibility to Ashok Chavan).

अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या सुरू असलेल्या कायदेशीर सुनावणीच्या अनुषंगाने ठाकरे सरकारने ही समिती नियुक्ती केली होती.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती

शरद पवारांच्या बंगल्यावर ‘कराड’वरून आला कोरोना

VIDEO : मंत्री जयंत पाटलांनी हातात लाऊडस्पीकर घेतला, अन् तळागाळात फिरून लोकांना सतर्क केले

राजेश टोपे म्हणतात, आरोग्य यंत्रणा आंतरराष्ट्रीय व कार्पोरेट दर्जाची करणार

परंतु विनायक मेटे यांनी, तसेच भाजपच्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात जोरदार तोफा डागायला सुरूवात केली होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची प्रभावी बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडत असल्याचा आरोप करीत अशोक चव्हाण यांना उपसमितीमधून हटवावे अशी मागणी मेटे यांनी केली होती.

मेटे अपप्रचार करीत आहेत. हे भाजपचे षडयंत्र आहे, असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला होता.

भाजपच्या मागणीकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलेच, पण अशोक चव्हाण यांच्यावरील जबाबदारी सुद्धा वाढविली. मराठा समाजाकडून येणाऱ्या सगळ्या मागण्यांची जबाबदारीही अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे ( Uddhav Thackeray ignored to BJP ). ठाकरे यांचा हा निर्णय भाजपसाठी चपराक, तर अशोक चव्हाणांवर टाकलेला विश्वास असल्याचे बोलले जात आहे.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी