31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeव्हिडीओVIDEO : प्रभाकर देशमुखांच्या समर्थनार्थ मुंबईकरांची तुडूंब गर्दी, अनुराधाताईंनी जिंकली उपस्थितांची मने

VIDEO : प्रभाकर देशमुखांच्या समर्थनार्थ मुंबईकरांची तुडूंब गर्दी, अनुराधाताईंनी जिंकली उपस्थितांची मने

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रभाकर देशमुख यांच्या समर्थनार्थ रविवारी एक बैठक घेण्यात आली होती. पण मुंबईतील माण – खटाववासीय चाकरमान्यांचा इतका तुडुंब प्रतिसाद मिळाला की, या बैठकीचे रूपांतर सभेमध्ये झाले.

कळंबोली येथे झालेल्या या सभेमध्ये मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात नोकरी करीत असलेले शेकडोजण उपस्थित होते. प्रभाकर देशमुख यांच्या वतीने त्यांच्या पत्नी अनुराधाताई देशमुख यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले.

प्रभाकर देशमुख यांनी प्रशासनात असताना केलेल्या जनहिताच्या प्रभावी कामांची यावेळी माहिती अनुराधाताईंनी दिली. लोधवडे गावांत टँकर यायचा. लोकांचे खूप हाल व्हायचे. म्हणून देशमुख यांनी लोधावड्यामध्ये जलसंधारणाची कामे केली. गाव टँकरमुक्त झाले. त्यानंतर देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान ही योजना आणली होती. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागामध्ये ही योजना प्रभावीपणे राबविली गेली. या योजनेच्या आधारेच त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साखळी सिमेंट योजना राबविली होती. त्या बंधाऱ्यांना पृथ्वी बंधारे असे नाव पडले. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रभाकर देशमुख यांची मंत्रालयात जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर थोड्याच दिवसांत नवे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्याकडे देशमुख यांनी जलयुक्त शिवारचे सादरीकरण केले. फडणवीस यांना ही योजना इतकी आवडली की, या योजनेसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून द्यायच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अगोदर जलसंधारण खाते कुणाला माहितही नव्हते. पण देशमुख यांच्यामुळे हे खाते संपूर्ण महाराष्ट्राला माहित झाल्याची आठवण अनुराधाताईंनी सांगितली.

VIDEO : प्रभाकर देशमुखांच्या समर्थनार्थ मुंबईकरांची तुडूंब गर्दी, अनुराधाताईंनी जिंकली उपस्थितांची मने
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अनुराधाताई प्रभाकर देशमुख.

उपस्थित सामान्य जनतेमधील अनेकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रभाकर देशमुख विद्वान, हुशार आहेत. त्यांना प्रशासकीय ज्ञान आहे. पाणी, शेती, उद्योग, ग्रामविकास, कौशल्य शिक्षण, शालेय शिक्षण अशा क्षेत्रात त्यांनी विपूल काम केले आहे. ते प्रचंड कष्टाळू आहेत. त्यांच्याकडे एवढी बलस्थाने असूनसुद्धा ते गर्विष्ठ नाहीत. जमिनीवर पाय ठेवून वावरतात. कुणाला तुच्छ लेखत नाहीत. कधी कुणाशी वाकडे वागत नाहीत. अतिशय सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते सगळ्यांशी आदराने वागतात. समोरच्या व्यक्तीचा सन्मान ठेवतात. त्यामुळे अशी व्यक्ती आमदार म्हणून निवडून आल्यास माण व खटाव तालुक्याचा मोठा विकास होईल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

Breaking : माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुखांना सगळ्या पक्षांचा पाठींबा, पत्रकार परिषदेत घोषणा

Video : मुख्यमंत्र्यांना कौतुक विरोधी पक्षातील उमेदवाराचे

आश्चर्यम : दोन सख्खे भाऊ भाजप – शिवसेनेच्या अधिकृत तिकिटांवर आमने सामने

गेल्या दहा वर्षांत आपल्या दोन्ही तालुक्यांत गुंडगिरी फोफावली आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी गावागावांत गुंड निर्माण केले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकरी, सामाजिक कार्यकर्ता, सरळमार्गी जनता, सरकारी कर्मचारी, पत्रकार अशा सुसंस्कृत लोकांमध्ये दहशत आहे. माण – खटावमध्ये विकासापेक्षा गुन्हेगारी जास्त वाढली आहे. प्रभाकर देशमुख जर आमदार झाले तर त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा विकासासाठी फायदा होईलच, पण त्यांच्यातील सुसंस्कृतपणामुळे गुंडगिरीसुद्धा नाहीशी होईल, अशी मते अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी माथाडी कामगार, धनगर संघटना यांनी प्रभाकर देशमुख यांना पाठींबा जाहीर केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी