32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजकृषी मंत्र्यांनी अडवल्या शेकडो फायली

कृषी मंत्र्यांनी अडवल्या शेकडो फायली

टीम लय भारी

मुंबई : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे कार्यालय सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कोणत्या फायली तात्काळ निकाली काढायच्या, व कोणत्या मुद्दाम दाबून ठेवायच्या याचे ‘कौशल्य’ भुसे यांनी चांगलेच आत्मसात केले आहे ( New pattern of Dada Bhuse’s office ).

‘फायलीं’च्या या पॅटर्नमुळे भुसे यांच्या कार्यालयाबद्दल मंत्रालयात खमंग चर्चा सुरू आहे. गेल्या पंधरवड्यात बदल्याचा हंगाम होता. या हंगामात कृषी मंत्री व त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कसे ‘हात धुवून’ घेतले याचे किस्से मंत्रालयात ऐकायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कृषी विभागावर संताप

शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कक्ष, आलिबागमध्ये झाली सुरूवात  

दाऊद इब्राहिमला भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

रोहित पवारांचा भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत

सुशांत प्रकरणाचा  तपास डॉ. दाभोलकर हत्या प्रमाणे होऊ नये : शरद पवार

विविध अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कृषी मंत्र्यांनी इतके लक्ष घातले की, या विषयावरील फायली बुलेट ट्रेनच्या वेगाने धावल्या ( Dada Bhuse shown interest in Transfers files). पण ‘महाविकास आघाडी’चे सरकार सत्तेत आल्यापासून अनेक फायलींकडे दादाजी भुसे यांनी ढुंकूनही पाहिलेले नाही, याबाबत खुद्द कृषी खात्यातील अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.

कक्ष अधिकारी, अवर सचिव, उप सचिव, सचिव यांच्यामार्फत ‘क्लियर’ झालेल्या शेकडो फायली भुसे यांच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. अधिकाऱ्यांकडून मंजूर झालेल्या या फायलींना भुसे यांच्याकडून का अडवणूक केली जात आहे, याबाबत कृषी खात्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ज्या व्यक्तीशी संबंधित फाईल असेल, ती व्यक्ती भुसे यांना प्रत्यक्ष जावून भेटली तरच फाईलला मंजुरी दिली जात आहे. प्रशासकीय फायलींचीही अडवणूक करून भुसे यांना नक्की काय संदेश द्यायचा आहे, असाही सवाल या खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे ( Dada Bhuse not sanctioned routine files).

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी