टीम लय भारी
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आज सोमवारी पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल १०० नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत.
काजळपुरा भागातील ‘तारीक गार्डन’ नावाची इमारत कोसळली असून या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. त्यातील ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” ही भीषण दुर्घटना रात्री ७ ते १५ दरम्यान घडली.