31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्ररेश्मा (मनुताई) देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज पूरग्रस्तांच्या मदतीला

रेश्मा (मनुताई) देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज पूरग्रस्तांच्या मदतीला

रसिका जाधव, टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावाला जाणारा रस्ता अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ता खचला आहे. या गावातील आपत्तीत संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रेश्मा (मनुताई) देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज चाकण हे या गावकऱ्याच्या मदतीसाठी सर्वात प्रथम धावून आले आहेत (Chakan is the first to come to the aid of this villager).

महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर रायगडच्या पायथ्याजवळ असणारी ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी आणि पाने ह्या गावाला जाणारा रस्ता अतिवृष्टी झाल्यामुळे रस्ता खचला आहे. त्यामुळे गावातील लोकांचा बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तरी या गावात लोकांची वाहतूक थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेली आहेत. गावातील दुकानातील आणि घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. लोकांचे संसार उध्दवस्त झाले आहेत.

‘भास्कर जाधव; तुला मंत्री बनवत नाहीत, म्हणून तू भूंकत राहिलायस’

माजी शाखा व्यवस्थापकाचा बँकेवर सशस्त्र दरोडा. एका महिलेचा मृत्यू

या गावात मागील आठ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत केला गेला आहे. लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे वयस्कर, अपंग, विधवा, मोलमजुर ह्या लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि हलाखीची झाली आहे.

Chakan is the first to come to the aid of this villager
पूरग्रस्तांसाठी जीवना आवश्यक वस्तू

शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

Maharashtra flood: 213 dead, eight missing as 103 villages in Raigad face landslide risk

या गावासाठी चाकण मधून रेश्मा (मनुताई) देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज तसेच बंटी टोपे, ओमकार गोरे, संतोष (बापू) साकोरे आणि तेजस माळी इत्यादींनी मदतीचा हात पुढे केला आहे. आपण ह्या समजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन चाकण मधील मित्र ग्रामस्थ आणि लोकांनी आपले भाऊ संकटात आहेत. त्यांना फूल नाही तर फुलाची पाखळी म्हणून थोडी तरी मदत करावी म्हणून आपल्या ताटातील एक घास पूरग्रस्त गरजू लोकांना दिला. त्यांच्या दुःखात आपला थोडासा हातभार लावून त्यांचे दुःख जरा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना जीवना आवश्यक वस्तूची मदत केली (Helped with the necessities of life).

चाकण मधील देशमुख कबड्डी क्रिडा मंडळ आणि कोल्ड कट्टा बॉईज यांचे मी गावकऱ्यांच्या वतीने मन पूर्वक आभार मानतो. तरी देखील कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे. तरी कृपया महाड तालुका  आणि  त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील इतर गावांना आपल्या मदतीची खूप गरज आज आहे. तरी कृपया एक हात मदतीसाठी…

पूरग्रस्त गावातील एक तरुण

-प्रा. विशाल मोहन खांबे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी