34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजMahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटना, 60 जणांना वाचवण्यात यश

Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटना, 60 जणांना वाचवण्यात यश

टीम लय भारी

रायगड : रायगज जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली (Raigad Mahad Building Collapse). येथे 5 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) रात्री जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 60 जणांना बाहेर काढलं.( Raigad building collapse incident  60 rescued). आतापर्यंत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 40  जण अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे.

 

एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत “एनडीआरएफचे तीन पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 60 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप 40 जण अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे. इमारत दुर्घटनेतील दोषींवर महाड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी