33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूज...आमदार खरेदी विक्रीचा बाजार तेजीत, आमदार फोडण्यासाठी ‘हे’ नेते लागले कामाला

…आमदार खरेदी विक्रीचा बाजार तेजीत, आमदार फोडण्यासाठी ‘हे’ नेते लागले कामाला

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपकडे स्वतःचे व अपक्ष असे मिळून १२५ पेक्षा जास्त आमदार नाहीत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षांतील आमदार फोडण्याशिवाय भाजपसमोर गत्यंतर राहिलेले नाही. आमदार फोडण्यासाठी भाजपमधील चार नेते जोरदार कामाला लागले आहेत. नारायण राणे, राधाकृष्ण विखे – पाटील, बबनराव पाचपुते व गणेश नाईक या चार नेत्यांनी महाविकास आघाडीचे आमदार गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

आशिष शेलार यांनीही, ‘आम्ही ऑपरेशन सुरू केले आहे. चार नेते या कामात गुंतले आहेत,’ अशी जाहीर कबुली पत्रकार परिषदेत दिली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या काही आमदारांना भाजपच्या नेत्यांनी फोन केल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनाही अजित पवार यांनी फोन केले होते. भाजपचे माजी मंत्री रविंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल रेनेसॉमध्ये आज सकाळी गेले होते. साध्या वेशातील पोलीसांनीही आमदारांवर पाळत ठेवली आहे. आमदार फोडाफोडीचे जोरदार प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य विधानसभेतील बहुमताच्या चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आमदारांना कडक संरक्षण

आपल्याकडील कोणताही आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहेत. सगळ्या आमदारांना आपापले नेते विश्वासात घेत आहेत. त्यांच्यासोबत वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पवई येथील रेनेसॉं हॉटेलमध्ये आहेत. पण त्यांना रात्री ठाण्यात स्थलांतरीत करण्यात आले आहे. जुहू परिसरातील जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार थांबलेले आहेत. शिवसेनेचे आमदारही येथून जवळच ललित हॉटेलमध्ये आहेत. मुंबईत शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या आमदारांना धक्काही लागू नये साठी शिवसैनिकांनी गस्त घातलेली आहे. हॉटेलच्या आतमध्ये भाजपचा कोणताही नेता पोचणार नाही याची शिवसैनिक काळजी घेत आहेत. एखादा नेता गेलाच तर त्याच्या नावाची जाहीर वाच्यता केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘भाजपकडे १७० आमदारांचे संख्याबळ’

शरद पवारांनी अजित पवारांना फटकारले

अजित पवारांच्या नव्या दाव्याने खळबळ : मी राष्ट्रवादीतच, शरद पवार आपले नेते

पुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

चोरून केलेलं काम कोणतं, हे शिवसेनेनं आम्हाला शिकवू नये : आशिष शेलार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी