28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूज‘शरद पवार भाजपला पाठींबा देणार, शिवसेनेतही भूकंप होणार’

‘शरद पवार भाजपला पाठींबा देणार, शिवसेनेतही भूकंप होणार’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शरद पवार हे आयत्या वेळी भाजपला पाठिंबा देतील, शिवसेनेतही मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष विधानसभेत १४५ आमदारांच्या बहुमताचा आकडा पार करतील, असा खळबळजनक दावा भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी केला आहे.

भाजप पूर्ण बहुमत सिद्ध करणार आहे. स्वतः शरद पवारांचाच भाजपाला पाठिंबा आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा १४५ पेक्षाही जास्त वाढेल, असाही दावा राणा यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते भालचंद्र शिरसाठ यांनीही शरद पवार आमच्यासोबतच आहेत. शरद पवार हेच भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधील सगळ्या मंत्र्यांचे खातेवाटप करतील, अशी पुढी सोडून दिली आहे. शरद पवार आमच्यासोबत आहेत अशा वावड्या भाजपच्या गोटातून आता उठवण्यात येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवारांनी मात्र भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याचे ट्विट केले आहे. आज आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीतही शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी आपलेच सरकार स्थापन होईल, असे सगळ्या आमदारांना सांगितले आहे. फडणवीस सरकार पाडायचे असल्याचे सुद्धा पवार यांनी आमदारांना सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

…आमदार खरेदी विक्रीचा बाजार तेजीत, आमदार फोडण्यासाठी ‘हे’ नेते लागले कामाला

‘भाजपकडे १७० आमदारांचे संख्याबळ’

शरद पवारांनी अजित पवारांना फटकारले

पुतण्या रोहितची काका अजितदादाला साद : परत या, परत या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी