31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबई'आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्त्व स्वीकारले'

‘आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्त्व स्वीकारले’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

हॉटेल ग्रॅंट हयात येथे आज काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना शपथ देण्यात आली.  ‘आम्ही सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, आणि आमचे नेते जे सुचना करतील तोच आम्ही आदेश मानू’ अशा शब्दांत सगळ्या आमदारांनी शपथ घेतली. यांत आदित्य ठाकरे सुद्धा यांनी सुद्धा ही शपथ घेतली आहे. तो धागा पकडून आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे.

मुंबईतील हॉटेल ग्रँट हयात येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मिळून १६२ आमदारांचे महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावर आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली. ओळख परेड आरोपींची होते आमदारांची नाही असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे.

आत्मबल गमावलेल्या नेत्यांनी एक टुकार प्रयत्न केला गेला असंही त्यांनी म्हटलं आहे. हा जनमताचा अपमान आहे. आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असेल यात काहीही शंका नाही असंही आशिष शेलार म्हणाले.
आज १६२ आमदार असल्याचा कांगावा या तीन पक्षांनी जरुर केला. तिथे १४५ तरी आमदार होते का? याचं उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला द्यावं लागेल असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आत्मबळ गमावलेल्या नेत्यांनी आज आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंही शेलार यंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात स्थापन झालेलं सरकार आपलं संख्याबळ सिद्ध करेल. पाच वर्षे दलित, पीडित आणि दुर्बल घटकांसाठीचं काम करणार असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी भरला दम : शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला ‘धडा’ शिकवू

धनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण…

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

भाजपला तूर्त दिलासा : न्यायालय उद्या निकाल देणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी