31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजखळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले...

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्हा पाच आमदारांना फसवून हरियाणातील गुरगाव येथे ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी तब्बल २०० भाजपच्या कार्यकर्त्यांची आमच्यावर गस्त होती. हरियाणाचे पोलीसही साध्या वेशात आमच्यावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो. आम्ही शरद पवारांना फोन केला, व पवार साहेबांनी तजवीज केली आणि आमची सुटका झाली…’ राष्ट्रवादीचे आमदार  अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार परत आले आहेत. परंतु पाच – सहा आमदारांचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यापैकी अनिल पाटील, दौलत दरोडा, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवळ व नितीन पवार हे पाच आमदार आज राष्ट्रवादीकडे परत आले आहेत. या पाच आमदारांना गुरगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर आता या आमदारांनी प्रसारमाध्यमांसमोर जी माहिती दिली ती खबळबळजनक अशीच आहे.

‘आम्ही फुटलो आहोत. आम्ही गायब झालो आहोत अशी जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांतून ऐकायला मिळत होती. पण आम्ही फुटिरवादी नाही. आमची फसवणूक झाली. शुक्रवारी आम्हाला अजित पवारांनी बोलावले होते. अजितदादा आमचे नेते आहेत. त्यामुळे आम्ही आलो. भाजपसोबत आपण सरकार बनवित आहोत असे आम्हाला सांगण्यात आले. शपथविधी झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की, भाजप व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना नवी दिल्लीला ठेवण्यात येणार आहे. बाकीचे आमदार सुद्धा पाठिमागून येत आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही गुरगावला गेलो. तिथे गेल्यानंतर दूरचित्रवाणीवर पाहिले की, शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेस, शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असे दूरचित्रवाणीवर पाहिले. त्यामुळे आम्ही शरद पवारांना फोन केला. राष्ट्रवादीचा पाठिंबा नक्की कुणाला आहे असे आम्ही पवार साहेबांना विचारले. पवार साहेब म्हणाले, आपण काँग्रेस व शिवसेनेसोबत आहोत. त्यावर आम्हाला परत यायचे आहे. काहीतरी करा अशी विनवणी आम्ही पवार साहेबांना केली. तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्था करतो असे पवार साहेब म्हणाले. हॉटेलच्या ठिकाणी १०० – २०० भाजपच्या कार्यकर्त्यांची आमच्यावर पाळत होती. साध्या वेशातील पोलिसांचेही लक्ष होते. त्यामुळे आम्ही घाबरलेलो होतो. पण पवार साहेबांनी तजवीज केली, आणि आमची सुटका झाल्याचे या आमदारांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

आम्हाला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमची सुटका केली. या कार्यकर्त्यांनी आम्हाला लिफ्टमधून खाली यायला सांगितले. लिफ्टमधून खालीनंतरचा बाहेर यायचा खुष्कीचा मार्ग सांगितला होता. त्या मार्गाने आलो आणि सुटका झाल्याचेही या आमदारांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. आम्ही शरद पवार यांचे भक्त आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असेही या आमदारांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीकडे १६२ आमदार, फडणवीस – पवारांकडे उरले अवघे १२६ जण

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

भाजपला तूर्त दिलासा : न्यायालय उद्या निकाल देणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी