33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजधनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण...

धनंजय मुंडे म्हणाले, माझे अजितदादांवर प्रेम, पण…

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : माझे अजितदादांवर प्रेम हा विषय वेगळा आहे. पण त्यापेक्षा जास्त प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व शरद पवारांवर आहे. अजितदादांशी माझे चांगले संबंध होते. पण ज्यावेळी त्यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्याशी माझे संबंध संपुष्टात आल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अजित पवार भाजपवाशी झाले त्यामागे धनंजय मुंडे यांचाच हात होता. अजितदादांसोबत धनंजय मुंडे अजूनही मनाने आहेत, असे आरोप मुंडे यांच्यावर होत होते. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, अजितदादा पक्षात होते तोपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. आता ते वेगळे झाले आहेत. त्यामुळे माझा त्यांच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. शपथविधीच्या आदल्या दिवशी माझ्या बंगल्यावरून आमदारांना फोन गेले होते. पण मी त्या दिवशी बंगल्यावर नव्हतो. माझ्या बंगल्यावरून फोन गेले याची मलाही माहिती नव्हती. बंगल्यावर कोणत्या आमदारांना बोलावले हे सुद्धा मला माहित नव्हते. माझा बंगला सगळ्यांसाठी खुला असतो. शपथविधीच्या दिवशी दुपारी सगळे नेते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जमा झाले होते. तिथे यायला मला उशीर झाला. कारण शपथविधीचे प्रकरण मला माहित नव्हते. मी त्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत झोपलो होतो. उठल्यानंतर मला कळले तेव्हा मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दाखल झालो असे मुंडे म्हणाले.

अजितदादांनी परत यावे म्हणून सगळे नेते समजावून सांगत आहेत. मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजूनही परत यायला हवे. मी राष्ट्रवादीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पवार साहेब व अजितदादा एकत्र होते. एकत्र निवडणूक लढविली होती. संविधानाला साक्ष मानून सगळ्या आमदारांनी शपथ घेतली. त्यामुळे सभागृहातही हेच दिसेल. मी पक्षाशी आणि शरद पवार साहेबांशी पहिल्यापासून , आताही आणि मरेपर्यंत एकनिष्ठ आहे. अजितदादा पवारांबरोबर २७ आमदारांचा गट आहे, व त्यांना मंत्रीपदे दिली जाणार हे कपोकल्पित आहे. आम्ही १६२ आमदार एकत्र आहोत. आम्ही भाजपला हरविण्यासाठी एकत्र आलो आहोत. अजितदादा पक्षाबाहेर गेल्यानंतर माझा त्यांच्याशी कसलाही संपर्क झालेला नाही

– धनंजय मुंडे

हे सुद्धा वाचा

महाआघाडीच्या १६२ आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये परेड

रावसाहेब दानवेंनी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला ठरवलं वेडं

पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केले पहिले काम, आजारग्रस्त महिलेला सव्वा लाखाचा धनादेश जारी

खळबळजनक : भाजपने लपविलेले पाच आमदार कडक पहारा फोडून शरद पवारांनी आणले परत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी