31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

शरद पवार म्हणाले, अजित पवारांना माझा छुपा पाठिंबा सुद्धा नाही

लय भारी न्यूज नेटवर्क

कराड : अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. त्यांना शरद पवारांचा छुपा पाठिंबा आहे, अशा पद्धतीचा संशय लोकांमध्ये आहे. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवारांना आपला छुपा पाठिंबा सुद्धा नाही. अजित पवारांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. हा निर्णय पक्षाच्या धोरणांच्या विरोधात असल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त शरद पवारांनी कै. चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या पक्षांच्या नेत्यांच्या वारंवार बैठका घेतल्या होत्या. त्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयासोबत अजित पवार सुद्धा होते. कुणाचे वेगळे मत असू शकते. ते मत बैठकांमध्ये व्यक्त करण्यात येते. परंतु बैठकानंतर पक्षाचे सगळे नेते मिळून एकत्रित निर्णय घेत असतात. निष्ठावंत नेता व कार्यकर्त्याला पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. आमच्या पक्षाने शिवसेना व काँग्रेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता. अजित पवार भाजपसोबत गेले तो निर्णय पक्षाचा नाही. पक्षाच्या धोरणाच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतला आहे. माझा सुद्धा अजित पवारांना पाठिंबा नाही. माझा पाठिंबा असता तर मी आमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगितले असते. मी एखादा निर्णय सांगितला तर पक्षाचे सगळे नेते व कार्यकर्ते माझे ऐकतात. परंतु अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मी पक्षाच्या नेत्यांना काहीही सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

भाजपची घटनाबाह्य कृती

भारतीय राज्य घटना, कायदे, नियम सगळे धाब्यावर बसवायचे. घटनेतील काहीही तरतूदी असूद्या, पण त्याकडे लक्ष द्यायचे नाही. आपल्याला जे हवे ते गैरमार्गाने करून घ्यायचे असे प्रकार भाजपने देशभरात सुरू केले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा भाजपने हेच केले असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

हे सुद्धा वाचा

LIVE Update : न्यायालयातील निकालाची सुनावणी

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या दीडशे आमदारांचे राज्यपालांना पत्र, न्यायालयातही हे पत्र सादर होणार

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख, भाजपचे ‘हे’ खासदार संतापले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी