35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रबनावट रॉयल्टी बूक छापून डंपर लॉबीचा सरकारला 'इतक्या' कोटींचा चुना

बनावट रॉयल्टी बूक छापून डंपर लॉबीचा सरकारला ‘इतक्या’ कोटींचा चुना

नवी मुंबईतील उरण (Navi Mumbai News) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून गौणखणीजांवरील (Minor Mineral) रॉयल्टी भरण्याचे बनावट पावती बूक (Fake Royalti Book Scam) बनवून राज्य सरकारला करोडोंचा चुना लावण्याचे काम सर्रासपणे चालू आहे. या बनावट रॉयल्टी पावत्यांचा वापर करून दिवसाला जवळपास 2 हजार डंपर मुंबईत प्रवेश करत आहेत. नवी मुंबईतील डंपर लॉबीकडून राज्यातील महसूल विभागाच्या डोळ्यांत दिवसाढवळ्या धूळफेक केली जात आहे. हा प्रकार समोर येताच क्रशर असोसिएशनकडून महसूल विभाग (Maharashtra Revenue Department) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी, नवी मुंबईतील पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट रॉयल्टी बूकवरील असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर कोणताही ओटीपी येत नाही. मात्र खऱ्या रॉयल्टी बूकवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ओटीपी नंबर जनरेट होतो. डंपर लॉबीकडून बनावट रॉयल्टी बूक तयार करून महसूल विभागाचे महिन्याला 22 कोटी नुकसान करण्यात येते. तर,वर्षाला जवळपास 250 ते 300 कोटींचे नुकसान करण्यात येत आहे. असाच प्रकार ठाणे, भिवंडी, पालघर भागात सुरू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबईतील पनवेल आणि उरण भागात शेकडोंच्या संख्येने क्रशरच्या प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या क्रशर प्लांटमधून दिवसाला अडीच ते तीन हजार डंपर रेती, खडी, आणि दगडांची निर्मिती केली जाते. त्यानंतर मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे या भागात बांधकामांसाठी हा माल पाठवला जातो.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात (MMRDA) अनेक खासजी बांधकाम प्रकल्प तसेच सरकारी प्रकल्पांसाठी त्यांचा नियमित मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यासाठी, राज्य सरकारचा महसूल विभाग या गौणखनिजांवर रॅायल्टी आकारात असतो. मात्र डंपर लॉबीकडून राज्यातील महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करण्यात येत असून रॅायल्टी भरण्याऐवजी बनावट पावती बूक छापून राज्य सरकारची फसवणूक करण्यात येत आहे.

हे ही वाचा 

शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ होणार; एकनाथ शिंदे मुंबईकरांना दिवाळी भेट

शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेल्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याची भावनिक साद

‘या’ व्हिडीओत पुणे पोलीस नक्की करतात काय? सुषमा अंधारेंचा सवाल

दरम्यान, दगडखाण असोसिएशन कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी तक्रार पाठवली असून यावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पनवेल तहसील कार्यालय, महसूल विभाग, आरटिओ आणि पोलिस यांच्यावर आरोप करत त्यांच्या आशीर्वादानेच सदर प्रकार सर्रासपणे घडत असल्याचा आरोप दगडखाण असोसिएशनकडून करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी