33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयरा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली बहुतांश राजकीय कारकिर्द घालविलेल्या भाजपमधील आयाराम आमदारांना आज चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजेरी लावावी लागली. राधाकृष्ण विखे – पाटील, गणेश नाईक व जयकुमार गोरे यांच्यासह अनेक काँग्रेस – राष्ट्रवादीच्या संस्कृतीमधील आमदारांना चक्क संघाच्या रेशीमबागेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेडगेवार स्मारक समितीच्या वतीने भाजपच्या सगळ्या आमदारांसाठी आज अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. महानगर सरसंघचालक राजेश लोया यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. या अभ्यासवर्गासाठी भाजपचे सगळे आमदार उपस्थित राहिले होते. यात भाजपमध्ये आगमन केलेल्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस – राष्ट्रवादीमधील आमदारांचाही समावेश होता.

हिंदूत्ववादी विचारधारेच्या रा. स्व. संघाविरोधात नेहमीच काँग्रेस – राष्ट्रवादीने भूमिका घेतलेली आहे. या पक्षात तावून सुलाखून तयार झालेल्या या पूर्वीच्या काँग्रेसी आमदारांवर चक्क रेशीमबागेत जाण्याची वेळ आली. राजकीय स्वार्थ विचारधारेसोबत तडजोड करायला कसा लावतो याचेच हे उत्तम उदाहरण असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात रंगली होती.

दुसरी बाजूही शिकायला मिळेल : विखे – पाटील

पूर्वी मी काँग्रेसमध्ये काम केले होते. पण काँग्रेसने तरी कुठे विचारधारा कायम ठेवली आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेसोबत तडजोड केली, आणि आपल्या विचारधारेला तिलांजली दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मला काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. आता मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाच्या विचारधारेशी जुळवून घेत आहे. त्यामुळे दुसरी बाजूही शिकायला मिळेल, अशी भावना आमदार राधाकृष्ण विखे – पाटील यांनी व्यक्त केली.

डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरूजींनी देशासाठी जीवन व्यथित केले : गणेश नाईक

देशासाठी जीवन व्यथित करणारे डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरूजी या दोन महान व्यक्ती आहेत. त्यांनी राष्ट्रप्रेम जपले होते. रा. स्व. संघ नेहमी राष्ट्रप्रेम शिवकतो. संघ कोणत्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. मी शिवसेनेत होतो. नंतर राष्ट्रवादीमध्ये आणि आता भाजपमध्ये आलो असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मंत्रीमंडळाला अंधारात ठेवून उच्च शिक्षण विभागात भरतीचा घाट

मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदांवर वर्णी लावण्यासाठी शेकडोजणांचे लॉबिंग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी