31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबलात्कारप्रकरणी माजी भाजप आमदारास जन्मठेप

बलात्कारप्रकरणी माजी भाजप आमदारास जन्मठेप

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपचा निलंबीत आमदार कुलदीप सिंह सेंगर याला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उन्नाव बलात्कारप्रकरणी न्यायालयाने सेंगर याला सोमवारी दोषी ठरविले होते. त्यानंतर आज शिक्षा सुनावण्यात आली.

कुलदीप सिंह सेंगरवर संबंधित पीडितेने आरोप केल्यानंतर भाजपवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर भाजपने सेंगरची पक्षातून हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणातील पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांबरोबर प्रवास करीत असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार ठोकर दिली होती. यात पीडित मुलगी वाचली. परंतु तिचे दोन नातेवाईक मात्र मरण पावले होते. हा अपघात नव्हता, तर सेंगर यानेच पीडितेला ठार करण्यासाठी मुद्दाम ट्रक अंगावर घातला होता, असा आरोप तिच्या नातलगांनी केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार हा खटला लखनौऐवजी नवी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात चालविण्यात आला होता.

न्यायालयाने सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावताना पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचीही सुचना केली आहे. या प्रकरणातील सहआरोपी शशी सिंग याची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चार वेळा निवडून आला होता. सन २०१७ मध्ये आमदार सेंगरने पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा सेंगरवर आरोप होता. तो न्यायालयात सिद्ध झाला आहे.

हे सुद्धा वाचा

‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

अभिनेत्री स्वरा भास्करचा भाजपवर नाव न घेता घणाघात, महंमद अली जीनांची दिली उपमा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी