34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७८ हजार कोटींची गरज : नारायण राणेंनी सांगितला खर्चाचा आकडा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७८ हजार कोटींची गरज : नारायण राणेंनी सांगितला खर्चाचा आकडा

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांचा संपूर्म सातबारा कोरा करायचा असेल तर ५३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत दिल्यास २५ हजार कोटींची गरज भासणार आहे. त्यामुळे एकूण ७८ हजार कोटी रुपयांचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडणार आहे. हा भार राज्य सरकारला परवडू शकतो का, याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला दिसत नाही, अशा शब्दांत भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी तोफ डागली.

नारायण राणे आज नागपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी २५ हजार कोटी रुपये दिले पाहिजेत असे उद्धव ठाकरेच सत्तेवर येण्यापूर्वी बोलले होते. निवडणुकीच्या प्रचारात तर त्यांनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी आता या दोन्ही मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सत्तेवर येऊन महिना होत आला. हिवाळी अधिवेशन संपत आले तरी त्यांनी या दोन्ही घोषणांची पूर्तता केलेली नाही. या घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अभ्यास करायला हवा होता. अभ्यास न करताच उद्धव ठाकरेंनी लोकानुनयी घोषणा केल्याचाही आरोप राणे यांनी केला.

विधानसभेचे अधिवेशन चालू आहे असे वाटतच नाही. हा घरगुती कार्यक्रम असल्यासारखे वाटत असल्याचीही खिल्ली राणे यांनी उडविली.

हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना आम्ही हिंदूत्ववादी असल्याचे सांगावे. सत्तेसाठी शिवसेनेने विचारधारेशी तडजोड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ‘टॅक्स फ्री’ आहे. ते कोणाशीही आघाडी करू शकतात. जनतेने भाजप – शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला होता. परंतु सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर अशी आघाडी झाली नसती.

– नारायण राणे

हे सुद्धा वाचला

बलात्कारप्रकरणी माजी भाजप आमदारास जन्मठेप

‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

अभिनेत्री स्वरा भास्करचा भाजपवर नाव न घेता घणाघात, महंमद अली जीनांची दिली उपमा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी