31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयसुखविंदर सिंग सुक्खु होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री; राज्यात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार...

सुखविंदर सिंग सुक्खु होणार हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री; राज्यात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार मुकेश अग्नीहोत्री

हिमचाल प्रदेश विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या असून काँग्रेसने येथे 40 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर हिमाचलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखविंदर सिंग सुक्खु यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर राज्यात प्रथमच उपमुख्यमंत्री होणार आहे. उपंमुख्यमंत्रीपदी मुकेश अग्नीहोत्री शपथ घेणार आहेत. रविवारी (दि11) रोजी दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडणार आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या शपथविधीसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर सुखविंदर सिंग सुक्खु म्हणाले, ‘मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि राज्यातील जनतेचा आभारी आहे. वयाच्या १७ व्या वर्षी मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जे केले ते मी कधीही विसरू शकणार नाही. हिमाचल प्रदेशातील जनतेला आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रीपदी निवड झालेले मुकेश अग्निहोत्री आणि मी एक टीम म्हणून काम करणार आहे.

भूपेश बघेल यांनी सांगितले की आज हायकमांडने सुखविंदर सिंग सुक्खु यांची मुख्यमंत्री आणि मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. हिमाचल प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांनी सांगितले की, सर्व आमदारांनी एकमताने सुखविंदर सिंग सुक्खु यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. उद्या त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.  हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह म्हणाल्या,  उद्या सुखविंदर सिंग सुक्खू शपथ घेतील आणि सरकार चांगल्यापद्धतीने चालवतील.

हे सुद्धा वाचा
सुषमा अंधारेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्णय

राज्यात मद्यविक्री वाढली; सरकारच्या तिजोरीत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा

पुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

तर मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेले काँग्रेसचे सरचिटणीस आणि सिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह म्हणाले की, काँग्रेस पक्ष हायकमांडने घेतलेल्या निर्णयाचा आदर करतो. पक्षाच्या निर्णयावर निराशा नाही. काँग्रेस पक्ष एकसंध आहे आणि एकसंध राहील, असे ते म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी