34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईNight curfew : नाताळ-थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘रात्रीची संचारबंदी’ लागणार

Night curfew : नाताळ-थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘रात्रीची संचारबंदी’ लागणार

टीम लय भारी

मुंबई : मुंबईत कोरोनाचा धोका कायम असतानाही ‘नाईट क्लब’, ‘पब’, हॉटेलांकडून सुरक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे २५, ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला ‘रात्रीची संचारबंदी’ (Night curfew) लावण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला असल्याचे सांगितले जाते आहे. त्यासाठी मार्गदर्शक नियमावलीही बनवण्यात आली असून आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहून रविवारी किंवा सोमवारी ही नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.

Night curfew : नाताळ-थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘रात्रीची संचारबंदी’ लागणार

मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यानंतरही मुंबईतील पब, हॉटेल, क्लबकडून कोरोना संदभार्तील मार्गदर्शन तत्वांचे पालन केले जात नाही. पब, हॉटेलमध्ये ५० लोक असावेत व रात्री ११ पर्यंत बंद करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन केले जात आहेत. पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री १२ वाजता लोअर परळच्या एपीटोम नाइट क्लबमध्ये सुमारे दोन हजार नागरिक तसेच सोमवारी वांद्रे येथील बॉम्बे अड्डा आणि पब व हॉटेलमध्ये २७५ जण विनामास्क आढळून आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

कोरोनाची लस घेतल्यावर दोघांची तब्येत बिघडली

कोरोनावर प्रभावी ठरेल अशी लस शोधण्यात जगातील शास्त्रज्ञांना यश आल्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेसह काही देशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जगातील बलाढ्य अशी औषधनिर्माण कंपनी असलेल्या फायजरने कोरोनावर लस बाजारात आणली आहे. ब्रिटननंतर अमेरिकन सरकारने त्यांच्या नागरिकांसाठी फायजर कंपनीची लस उपलब्ध करून दिली आहे. मात्र या लशीबाबत काही तक्रारी पुढे आल्या आहेत. अमेरिकेतील अलास्का शहरात दोन आरोग्य कर्मचा-यांना लस दिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याचे दिसून आले.

लस दिल्यानंतर पहिल्या दहा मिनिटातच तिची तब्येत खालावू लागली, अशी माहिती बार्टलेट रिजनल हॉस्पिटलच्या अधिका-याने दिली. महिलेचा चेहरा तसेच गालावर पुरळ दिसू लागले. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही वेळ श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यानंतर या महिला कर्मचा-याला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. रात्रभर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर ड्रिप हटवण्यात आले.

याच रुग्णालयातील आणखी दुस-या एका आरोग्य कर्मचा-यालाही फायजरची लस देण्यात आली होती. ही लस घेतल्यावर या कर्मचा-याला देखील असाच अनुभव आला. लस दिल्यानंतर कर्मचा-याच्या डोळ्याला सूज आणि घशामध्ये खवखव जाणवली. त्याला चक्करही येत होते. या कर्मचा-यालासुद्धा सर्वप्रथम अॅलर्जीची औषधे देऊन उपचार करण्यात आले. एका तासानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले.

दरम्यान, फायजरने लस तयार करण्यापूर्वी ४४ हजार वैद्यकीय स्वयंसेवकांवर याची चाचणी केली होती. या चाचणीदरम्यान लस ९५ टक्के अचूक असल्याचे सिद्ध झाले होते. मात्र अलास्कात लशीच्या साइड इफेक्टमुळे अमेरिकी नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

अॅलर्जीचा त्रास असलेल्यांना ही लस देणे टाळावे

अॅलर्जीचा त्रास असलेल्यांना ही लस देणे टाळावे, अशी सूचना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने सुद्धा केली होती. फायजर कंपनीनेही लस घेणा-यांना हा स्पष्ट इशारा दिलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी