31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअजित पवारांची एसटी कर्मचाऱ्यांना विनंती...

अजित पवारांची एसटी कर्मचाऱ्यांना विनंती…

टीम लय भारी

विलनीकरणाच्या मागणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या अहवालानतंर निर्णय घेण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देखील आता वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी(Ajit Pawar’s request to ST employees)

परिवहन मंत्री अनिल परब यांनीही संयम दाखविला आहे, आता त्यांचीही सहनशीलता संपत आली आहे, त्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, अमेय खोपकरांचं उपहासात्मक ट्वीट

दिल्लीत ओमिक्रॉन प्रकाराची 10 नवीन प्रकरणे आढळली- सत्येंद्र जैन

शाळा, कॉलेज, परीक्षा सुरु झाल्या आहेत आणि अशावेळी सर्वसामान्यांना एसटीचा उपयोग होतो. एसटी कर्माचारी हट्टाला पेटले आहेत, हे बरोबर नाही. कर्मचारी आणि प्रवासीसुद्धा आपलेच आहेत. समजूदारपणे भूमिका घेतली पाहिजे. मी अनेकदा सांगितले आहे असं पवार यांनी म्हटलं आहे.

जळगाव  येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत भाष्य केले. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हट्ट योग्य नाहीत, त्यांनी आता दोन पावले मागे सरकायला हवे असे पवार यांनी यावेळी सांगितले. नवीन भरती केली तर अडचणीत वाढ होणार आहे.

मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ

MSRTC staff should take sensible approach to avoid extreme steps by govt: Ajit Pawar on strike

मागे एसटी कर्मचाऱ्यांना मानधन कमी होते हे मान्य आहे. मात्र, आता बऱ्यापैकी मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना वेळेतच पगार दिला जाणार असून, त्याला राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

राज्यातला कुठलाही प्रश्न तो मांडणाऱ्यांनी दोन पावले पुढे मागे सरकले पाहिजे. ज्यांच्याकडे मागणी करण्यात येते त्यांनीही दोन पावले मागे सरकले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारने स्वीकारली. अनिल परब सातत्याने त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. असे असून कर्मचारी मागे हटण्यासाठी तयार नाहीत. माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी