31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअजितदादा पहिल्यांदाच गेले ‘मातोश्री’वर

अजितदादा पहिल्यांदाच गेले ‘मातोश्री’वर

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज मातोश्रीवर गेले. शुभेच्छांच्या निमित्ताने अजितदादांचे पहिल्यांदाच मातोश्रीवर जाणे झाल्याचे सूत्रांनी सांगितले ( Ajit Pawat first time went to Matoshri ) .

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ‘मातोश्री’ हे केवळ निवासस्थान न राहता राज्यातील महत्वाचा राजकीय केंद्रबिंदू ठरलेले आहे. राज्याच्या राजकारणात ‘मातोश्री’चे नाव नेहमीच चर्चेत असते.

Mahavikas Aghadi

बाळासाहेब ठाकरे हयात असताना शरद पवार मातोश्रीवर गेले होते. नंतर आता ‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर महिनाभरापूर्वीच शरद पवार पुन्हा मातोश्रीवर गेले होते. परंतु मातोश्रीवर जाण्याचा योग अजितदादांना कधी आला नव्हता.

हे सुद्धा वाचा

अजितदादांचा मोठा निर्णय, ‘कोरोना’साठी पुण्यात तीन जम्बो रूग्णालये उभारणार

अजितदादांच्या ‘संपर्का’तील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, अन्य मंत्र्यांची पाचावर धारण

अजितदादा पवार हे पुण्यात होते. पण आज आवर्जून ते मातोश्रीवर आले. उद्धव ठाकरे यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या ( Ajit Pawar given birthday wishes to Uddhav Thackeray ).

सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, शरद पवारांकडूनही शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तसेच काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुरध्वनीवरून ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी मराठीतून पत्र पाठवूनही वेगळ्या शुभेच्छा ठाकरे यांना दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी