32 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
Homeमुंबईआमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे सुद्धा...

आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे घेत आहेत नगरसेवक पदाचे सुद्धा मानधन

टीम लय भारी
मुंबई : नगरसेवक, खासदार पद असणाऱ्यांना त्यांच्या एकाच विभागाचे मानधन त्यांना मिळते. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनात नगरसेवक असलेल्या तीन लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार असा पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ( Anil gavali filed RTI to know more about how much honorariums leaders are rewarded with )

पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे अशी या तिघांची नवे असून नगरसेवक पालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस चिटणीस खात्याने दिली आहे. (RTI volunteer anil galgali to file RTI)

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेपासून आयपीएल पुन्हा सुरू

Anil
आरटीआयकार्यकर्ते अनिल गलगली

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

आरटीआयकार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागितल्यानंतर चिटणीस खात्याने संगीतले. सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहेत त्यांचे नाव, वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी. असेही गलगलीनी चिटणीस खात्यास सांगितले होते.

खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा रु. 25,000/- मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता रु. 150/- भत्त्यासाठी अश्या केवळ चार सभांकरिता दिले जाते. असे चिटणीस खात्याने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले होते.

दोन आठवड्यांपासून पालघर जिल्ह्यातील वसई विरार मध्ये लसीकरण बंद!

Mumbai: BMC Commissioner Iqbal Singh Chahal awarded ‘Mumbai Ratna’ for being ‘architect’ of city’s COVID-19 model

जे नगरसेवक, आमदार आणि खासदार बनले आहेत त्यांनी राजीनामे द्यायला हवे होते किंवा कमीतकमी मानधन घेणे अपेक्षित होते. असे मत अनिल गलगली यांनी यावेळी मांडले. परंतु दुर्दैवाने कोणत्याही पक्षाने असा निर्णय घेतलेला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी