31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

 

टीम लय भारी
बारामती : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा कराड येथे साखर कारखाना आहे. साखरेचे भाव वाढल्याने बाळासाहेब पाटील यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितले(Balasaheb Patil’s Sahyadri Sugar Factory has about 20 lakh bags of sugar left).

बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्याकडे जवळपास 20 लाख पोती साखर शिल्लक आहे. या भागात त्यांचे चांगलेच वजन आहे. बाळासाहेब पाटील म्हणतील ती पूर्व दिशा, अशा शब्दांत अजित पवारांनी बाळासाहेब पाटलांवर कोट्या केल्या(Senior leader Sharad Pawar also had a hand of blessing behind him).

‘निवडणुका लागल्या की महिलाशक्ती आठवते, सरकारचा कोडगेपणा’

टोमॅटो बाजारात घसरला, IAS विवेक अगरवालांनी घेतली दखल

Balasaheb Patil
उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्या पाटलांच्या कानपिचक्या

त्या भागात बाळासाहेब ठरवतील तो उमेदवार निवडून येतो परंतु माळेगाव कारखान्यात निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेब तावरेंचा घाम निघतो असेही अजित पवार पुढे म्हणाले.
एक निवडणुकीत पक्षाने बाळासाहेबांस संधी दिली नाही तेव्हा त्यांनी बंडखोरी केली व 43 हजारांच्या मतांनी ते निवडून आले. त्यावेळी आमचेही त्यांना सुप्त समर्थन होते. त्याचबरोबर जेष्ठ नेते शरद पवार यांचेही त्यांच्यापाठी आशीर्वादाचे हात होते.

एका शिवसैनिकाचे बोचरे व्यंगचित्र, भाजप – नारायण राणेंवर निशाणा !

Leader balasaheb patil to Congress claims party leader

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची  उपबाजारात मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचे भूमीपूजन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. त्यावेळी बाळासाहेब पाटलांचे कौतुक करताना सौम्य शब्दांत अजित पवारांनी त्यांच्या कानपिचक्या घेतल्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी