31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालयबाळासाहेब थोरातांच्या ‘या’ निर्णयाचा 29 लाख लोकांना मिळाला लाभ

बाळासाहेब थोरातांच्या ‘या’ निर्णयाचा 29 लाख लोकांना मिळाला लाभ

टीम लय भारी

मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे तब्बल 29 लाख लोकांना फायदा मिळाला आहे ( Balasaheb Thorat benefits 29 lakh people ).

‘कोरोना’ काळात लोकांची परवड होऊ नये म्हणून बाळासाहेब थोरात यांनी हा निर्णय घेतला. त्यांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘सात बारा’ आणि ‘8 अ’ खाते उतारे डिजिटल स्वरूपात काढण्याची सोय महसूल विभागाने सुरू केली आहे.

या नव्या सुविधेमुळे अवघ्या साडे तीन महिन्यांतच तब्बल 29 लाख जणांनी सात बारा उतारे, तर 3 लाख जणांनी खाते उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत पाटलांना चार वर्षांत जे जमले नाही, ते बाळासाहेब थोरातांनी एक वर्षात करून दाखविले

Balasaheb Thorat : भाजपाला भारतीय शेतकरी हा पाकिस्तानपेक्षाही मोठा शत्रू वाटतो – बाळासाहेब थोरात

Politics : देवेंद्र फडणविसांनी मारली थाप, बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला संताप

गिरीश महाजन यांची आर्थिक नाकाबंदी!

या संगणकीकृत सातबाऱ्यामुळे नागरिकांचे श्रम, पैसा व वेळ वाचत आहे. तहसिलदार, तसेच तलाठ्यांकडे होणारी गर्दीही कमी झाली आहे.

डिजिटल सात बाऱ्यावर सरकारचा लोगो तसेच बारकोड आहे. बारकोड स्कॅन करून सातबाऱ्याची सत्यता तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कुणालाही बनावट सात बारा उतारे तयार करणे, किंवा सात बाऱ्यावर खाडाखोड करणे शक्य होणार नाही. असा बनावटपणा बारकोडमुळे लगेचच उघड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा, कृषी अशा विविध खात्यांतील योजनांसाठी सातबारे आवश्यक असतात. अशा खात्यांतील अधिकाऱ्यांना लाभार्थ्यांचे उतारे परस्पर मिळवता येणार आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणेला कामाचा निपटारा वेगाने करणे शक्य होणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी