32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयबाळासाहेब थोरातांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, गांधी जयंतीपासून सात बारा मोफत घरपोच मिळणार

बाळासाहेब थोरातांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, गांधी जयंतीपासून सात बारा मोफत घरपोच मिळणार

टीम लय भारी

श्रीरामपूर : बाळासाहेब थोरातांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठी घोषणा केली. महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. परंतु दोन ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत मोफत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. श्रीरामपूर येथे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशी घोषणा केली (Balasaheb Thorat big announcement for farmers).  

शेतकऱ्यांना सहज आणि लवकर सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळीची बचत देखील होईल. यामुळे याच एक भाग म्हणून महसूल विभागाने खाते उतारा सोपा सुटसुटीत आणि बिनचूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा नवीन खाते उतारा थेट शेकऱ्यांच्या हातात देणार आहेत.

नरेंद्र मोदींचे जाचक कायदे महाराष्ट्रात होऊ देणार नाही : बाळासाहेब थोरात

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या गावात रस्त्याचे काम सुरू, बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार

राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे (This modern Satbara Utara is easy and perfect for the farmers to understand).

Balasaheb Thorat big announcement for farmers
खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे

खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात दोन ऑक्टोबरपासून सुरू करणार आहेत. श्रीरामपूर येथे शासकीय कार्यक्रमानिमित्ताने आले असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या उपक्रमाची घोषणा केली.

अजित पवार म्हणाले, बाळासाहेब पाटलांकडे २० लाख पोती साखर; लय पैसे कमविणार

https://english.lokmat.com/maharashtra/balasaheb-thorats-twitter-account-blocked-for-violating-rules/

खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याबद्दल बोलताना महसूल मंत्री म्हणाले, नागरिकांना सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे. याशिवाय पुढील काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेण्याचेही महसूल यंत्रणेस स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी