35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयअजित पवार, अनिल परब यांच्यावरही सीबीआयची कुऱ्हाड, भाजपने कंबर कसली

अजित पवार, अनिल परब यांच्यावरही सीबीआयची कुऱ्हाड, भाजपने कंबर कसली

टीम लय भारी

मुंबई :-  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवाहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, अशी थेट मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे यांनी पत्रात वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत (BJP has demanded a CBI probe into Ajit Pawar and Minister Anil Parab).

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असे चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे (It will be important to see what decision Amit Shah takes after the BJP state president sends a letter to the Union Home Minister).

प्रकाश आंबेडकर मुस्लिम आरक्षणासाठी सरकार विरोधात मोर्चा काढणार

शरद पवार मोठे नेते आहेत, हे मी मानत नाही; गोपीचंद पडळकर

भाजपचा ठराव 

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच गणेश हाके उपस्थित होते. माधव भांडारी म्हणाले की, भाजपाच्या 25 जून रोजी झालेल्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी ठरावाद्वारे केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे (The state president has sent a letter to the Union Home Minister).

चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवण्याबद्दल आरोपी असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टाला एप्रिल महिन्यात एक हस्तलिखित पत्र सादर केले होते.

पवारांच्या भेटीनंतर शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

Maharashtra: In letter to Amit Shah, state BJP chief Patil seeks CBI probe against Ajit Pawar, Parab

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने दर्शन घोडावत नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितले तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी आपल्याला मुंबई महापालिकेच्या पन्नास कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये तसेच सैफी ट्रस्टकडूनही खंडणी वसूल करण्यास सांगितले, असे गंभीर आरोप सचिन वाझे याने हस्तलिखित पत्रात केले आहेत.

BJP has demanded CBI probe into Ajit Pawar and Anil Parab
अजित पवार आणि अनिल परब

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील वसुलीच्या आरोपांची सीबीआय चौकशी होत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांच्याविरोधातील वाझेच्या पत्रातील आरोपांची सखोल सीबीआय चौकशी होणे गरजेचे आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे की, प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आणि प्रदेश कार्यसमिती बैठकीत ठराव मंजूर करणाऱ्या दोन हजार पदाधिकाऱ्यांतर्फे आपण ही मागणी करत आहोत. तसेच राज्यातील कायदा पाळणाऱ्या सामान्य नागरिकांच्या वतीनेही आपण ही मागणी करत आहोत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी