33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबोडारवाडी धरणाकरीता लढा देणार : डॅा. भारत पाटणकर

बोडारवाडी धरणाकरीता लढा देणार : डॅा. भारत पाटणकर

टीम लय भारी

पाचगणी : दुर्गम जावळी तालुका पर्जन्यमान आहे. पाणी अडवुन त्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे जावलीत बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे . दुर्गम जावलीतील युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईचा रस्ता  धरावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आली तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे (Bondarwadi dam will be constructed to solve the problem of common people in Jawali taluka).

सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकारातुन पिचत पडलेल्या जावलीकरांच्या अर्थाजनाचा प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज आहे. श्रमिक मुक्ती दल धरण कृती समितीच्या साहाय्याने लढा उभा करणार असून ५४गावांनी संघटित राहून या लढ्यासाठी पुढे यावे.  असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर  यांनी केले 

मेढ्यातील कलश मंगल कार्यालयात बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित ५४ गावांतील ग्रामस्थांच्या मेळाव्यात  ते बोलत होते. यावेळी  कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती बापूराव पार्टे,शिवसेना क्षेत्र प्रमुख एस. एस. पार्टे, संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, जावळी सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, संचालक आनंदराव सपकाळ, शांताराम आंग्रे, विजयराव सावले, राजेंद्र धनावडे, विनोद शिंगटे,आदिनाथ ओंबळे, उषा उंबरकर, भाऊसाहेब उभे, सखाराम सुर्वे, आनंदराव जुनघरे,दत्ता बेलोशे, सुरेश जाधव, संजय गाडे,नारायण सुर्वे, मंदाकिनी भिलारे, सुधा चिकणे, आतिष कदम,बजरंग चौधरी,श्रीरंग बैलकर,आदींची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक !

विनोदाचा बादशाह… अभिनेता लक्ष्याचा आज जन्मदिवस

यावेळी भारत पाटणकर  म्हणाले, कृष्णा खोऱ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असून देखील सरकारने केळघर विभागाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. येथे पाणी नसल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ विस्थापित होत आहेत. शाळा बंद पडत आहेत. गावे ओस पडली आहेत. हे धक्कादायक आहे. ५४ गावांना बोंडारवाडी धरणातून सहजपणे पाणी उपलब्ध होईल.धरणामुळे विस्थापित होणाऱ्या ग्रामस्थांना वाऱ्यावर न सोडता त्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर व ५४ गावातील शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय राज्य शासनाने न घेतल्यास महात्मा फुले यांच्या समन्यायी पाणी वाटपाचा आसूड हा आम्ही ज्यांना ही भाषा समजत नाही. आणि  ब्रिटिश राजवटीच्या प्रमाणे पाणी मोजण्याची सवय लागलेल्याना महात्मा फुले यांच्या आसूडाच्या वाटीने फटकरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

५६ इंच का जिगरा…,जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते २ चा ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra Reports 889 Covid Cases On Monday, Lowest Since March 2020

आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी ५४गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवावी.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने वेळोवेळी संघर्ष केला असून राज्यातील सांगोला, आटपाडी,तासगाव येथे श्रमिक मुक्ती दलाने शेतकऱ्यासाठी लढा दिला असून ५४गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

निमंत्रक विजयराव मोकाशी म्हणाले, धरण कृती समितीच्या वतीने गेल्या १३वर्षांपासून धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहे.नियोजित धरण हे मूळ धरण रेषेवर करावे, अशी कृती समितीची मुख्य मागणी असून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी धरण शासनाने करावे.

याबाबतही कृती समितीने आग्रही भूमिका घेतली असून धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कृती समिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  काम करणार आहे. धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५४गावांनी आतापर्यंत साथ दिली असून यापुढेही अशीच साथ द्यावी,असे आवाहन केले.

या मेळाव्याला ५४गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, महिला, युवक, मुंबईकर, पुणे स्थित उद्योजक उपस्थित होते. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. आदिनाथ ओंबळे यांनी आभार मानले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी