31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeव्यापार-पैसानगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा...

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची  टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली(a journey of village boy ). यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सोनाई परिसरातील एका तरुण व्यवसायकासोबत गप्पा मारल्या. जयकुमार अण्णासाहेब दराडे असं त्या तरुण व्यवसायकाचं  नावं  असून त्याने BBA मध्ये  (Marketing) केलं आहे. त्याने गुऱ्हाळ व रसवंती चा व्यवसायचा चालू केला. त्याच म्हणणं आहे की  कोणाच्या हाताखाली काम न करता स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे व स्वतः मालक राहिलं पाहिजे तो रसवंतीचा व्यवसाय करतो व त्याचबरोबर १००% ऑरगॅ निक गूळ देखील  बनवतो व वेगवेगळ्या स्वादाचे  देखील गूळ बनवले जातात  जसं  की  पुदिना, अदरक, वेलची.  १० ते २० लाख  महिन्याला ह्या दोन्ही व्यवसायातून त्याची कमाई होते व त्याचबरोबर त्याने कामाला  १७ माणसं देखील ठेवली आहेत. स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग त्याने ह्या व्यवसायासाठी केला आहे. मुंबई(Mumbai) आळंदी ह्या ठिकांवरून देखील त्याला गुळाच्या ऑर्डर येतात .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी