31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रदाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष...

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर,विक्रम भावे हे निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींची नावे आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court acquits three, convicts two)तब्बल ११ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून या प्रकरणी तीन आरोपींना निर्दोष करार देण्यात आला असून पैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर,विक्रम भावे हे निर्दोष मुक्त केलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या ११ वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्याचा अखेर आज निकाल लागला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो, ११ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. जे खरे शूटर्स होते त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे हि महत्वाची बाब आहे. आम्ही समाधानी आहोत, असं त्यांनी नमूद केले.

हे देखील वाचा

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

गौरी लँकेश यांच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा २०१८ साली सचिन अंदुरे आणि शरद केळुसकर हे दोघे आरोपी पकडले गेले होते. त्या आधी जवळपास २०१३ ते २०१८ अशी पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. या निर्णयात दोन आरोपींना शिक्षा दिली गेली असली तरी सबळ पुराव्याअभावी ज्या तीन आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ असे मुक्ता दाभोलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमच्या वकिलांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात पुढे वाटचाल करू असे हि त्या म्हणाल्या.
शिवाय या प्रकरणावर शरद पवारांनीही आपले मत व्यक्त केले आहे. पवार म्हणाले कि, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाच्या निकालाला इतकी वर्षे लागली त्यामुळे आम्ही अस्वस्थ होतो. किमान काही तरी निकाल आज त्यांनी दिलाय. दाभोलकर यांच्या आत्म्याला काही अंशी का असेना न्याय मिळाला. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार सुटला त्याबाबत राज्य सरकारने अपील करावे, असे पवार म्हणाले .

हे देखील वाचा

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

या प्रकरणात सुटका झालेल्या आरोपींच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सुटलेल्या आरोपींविरोधात आम्ही वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे साधक विक्रम भावे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता झाली. त्यामुळे भगवा आतंकवाद सिद्ध करण्याचा अर्बन नक्षलवाद्यांचा डाव फसला, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या इतर दोन साधकांना जन्मठेप झाली आहे. सदर संस्था धर्माच्या आडून दहशतवादी कृत्य करते, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. हा निकाल ताबडतोब लागला असता तर पानसरे , कलबुर्गी, गौरी लँकेश यांच्या हत्या झाल्या नसत्या. मारेक-यांना शिक्षा झाली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हे निर्दोष सुटले असल्याने त्याविषयी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची सर्व स्तरातून मागणी होत आहे.

हे ही पहा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी