30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्यापार-पैसाIndia GDP : भारताचा GDP आणखी घसरणार, जागतिक बँकेचा चिंता वाढविणारा अंदाज...

India GDP : भारताचा GDP आणखी घसरणार, जागतिक बँकेचा चिंता वाढविणारा अंदाज !

जागतिक बॅंकेकडून गुरुवारी भारतासाठी 2022-23 (FY23) वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज सांगण्यात आला. यामध्ये भारताचा जीडीपी दर आणखी कमालीचा घसरणार असल्याचे समोर आले आहे.

देश सध्या आर्थिक संकटातून जात असला तरीही त्यातून कोणता पर्याय निघू शकेल का म्हणून केंद्र सरकार कायम प्रयत्नशील असल्याचे दिसून येते परंतु यावेळचे संकट काहीसे मोठे असून त्यामुळे जागतिक बॅंकेच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. जागतिक बॅंकेकडून गुरुवारी भारतासाठी 2022-23 (FY23) वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज सांगण्यात आला. यामध्ये भारताचा जीडीपी दर आणखी कमालीचा घसरणार असल्याचे समोर आले आहे. जीडीपी वाढीचा अंदाज 7.5% च्या आधीच्या अंदाजावरून 6.5% पर्यंत कमी होणार सांगण्यात आले आहे. दरम्यान सदर घसरण रशियाच्या युक्रेनवरील आक्रमण आणि जागतिक चलनविषयक घट्ट होणा-या गळतीमुळे झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

दक्षिण आशियावरील अहवाल व्यक्त करताना जागतिक बॅंकेने जीडीपीच्या घसरणीवरून चिंता व्यक्त केली. यावेळी बॅंकने म्हटले आहे की, उच्च अनिश्चितता आणि उच्च वित्तपुरवठा खर्चामुळे खाजगी गुंतवणूक वाढ कमी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने जागतिक मागणी कमी झाल्यामुळे देशाच्या निर्यातीवर परिणाम होईल असे नमुद केले आहे. जागतिक बँकेकडून FY23 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज सुधारण्याची ही तिसरी वेळ आहे. जूनमध्ये बॅंकने भारताचा FY23 GDP वाढीचा अंदाज 7.5% पर्यंत कमी केला होता, तर यापूर्वी एप्रिलमध्ये, त्याने अंदाज 8.7% वरून 8% पर्यंत कमी केला होता.

दरम्यान जीडीपीच्या या बदलत्या वाढीची चिंता लक्षात घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सुद्धा अलीकडेच चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक वाढीचा अंदाज 7.2% वरून 7% पर्यंत कमी केला आहे, जो जागतिक स्तरावर विस्तारित देशांतील एकमेकांवरील आक्रमणे आणि आक्रमक चलनविषयक धोरण कारणीभूत ठरत असल्यामुळे आरबीआय सुद्धा चिंतेत सापडली आहे. याआधी आरबीआयने एप्रिलमध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 7.8% च्या आधीच्या अंदाजापेक्षा 7.2% पर्यंत कमी केला होता.

हे सुद्धा वाचा…

Udit Narayan : दिग्गज गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IRCTC : आता फिरण्यासोबत उपचार घेणेही झाले सोपे! जाणून घ्या काय आहे नविन योजना

Murder Mistry : अपहरण झालेल्या ‘त्या’ कुटुंबियांचे मृतदेह हाती

भारताच्या FY’23 च्या पहिल्या तिमाहीत वास्तविक GDP 13.5% ने वाढला परंतु 3.8% ने कोरोना महामारीपूर्वीच या पातळीला मागे टाकले. गुंतवणुकीच्या मागणीत भरघोस वाढ झाल्यामुळे सदर स्थिती पाहावयास मिळाली. दरम्यान या संपुर्ण परिस्थितीवर UN एजन्सीने सुद्धा भाष्य केले असून उच्च वित्तपुरवठा खर्च आणि कमकुवत सार्वजनिक खर्चाचा हवाला देऊन भारताची आर्थिक वाढ 2021 मधील 8.2% वरून यावर्षी 5.7% पर्यंत घसरेल असे म्हटले आहे.

युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD) ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2022 च्या अंदाजानुसार, 2023 मध्ये भारताचा GDP आणखी घसरून 4.7% वाढेल असे सांगण्यात येत आहे. 2021 मध्ये भारताने 8.2% विस्तार अनुभवला, जी 20 देशांमध्ये सर्वात मजबूत मानली जाते, परंतु पुरवठा साखळीतील मागणी कमी झाली आणि वाढत्या देशांतर्गत मागणीमुळे चालू खात्यातील अधिशेष तुटी बदलल्या त्यामुळेच वाढ खुंटली असे अहवालात म्हटले आहे.

चलनवाढीचा दबाव आणि स्पर्धात्मक परिस्थितींमध्ये, भारतातील सेवा क्षेत्रातील दरवाढ सप्टेंबरमध्ये सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला कारण नवीन व्यवसायाचा ओघ मार्चपासून सर्वात कमी दराने वाढला. या संपुर्ण घडामोडींबाबत S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या इकॉनॉमिक्स असोसिएट डायरेक्टर पॉलीआना डी लिमा यांनी सुद्धा भाष्य केले आहे. लिमा म्हणतात, भारतीय सेवा क्षेत्राने अलीकडच्या काही महिन्यांत अनेक संकटांवर मात केली आहे, नवीनतम PMI डेटाने सप्टेंबरमध्ये वाढीचा वेग कमी होऊनही मजबूत कामगिरी दाखवणे सुरू ठेवले आहे असे पॉलीआना डी लिमा यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी