29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
HomeजागतिकMurder Mistry : अपहरण झालेल्या 'त्या' कुटुंबियांचे मृतदेह हाती

Murder Mistry : अपहरण झालेल्या ‘त्या’ कुटुंबियांचे मृतदेह हाती

बागेत सापडलेल्या मृतदेहांमध्ये आई, वडिल, काका आणि एका आठ महिन्यांच्या चिमुकलीचा सुदधा समावेश आहे. सदर कुटुंब भारतीय असून पंजाबच्या होशियापूर जिल्ह्यातील टांडा येथील रहिवासी आहेत.

अपहरण झालेल्या पंजाबी कुटुंंबियांचे मृतदेह अखेर हाती लागले असून कुटुंबातील चारही जणांचे मृतदेह एका बागेत आढळून आले आहेत. सदर घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियात घडली असून याबाबतची सदर माहिती कॅलिफोर्नियाच्या शेरिफ यांनी दिली आहे. बागेत सापडलेल्या मृतदेहांमध्ये आई, वडिल, काका आणि एका आठ महिन्यांच्या चिमुकलीचा सुदधा समावेश आहे. सदर कुटुंब भारतीय असून पंजाबच्या होशियापूर जिल्ह्यातील टांडा येथील रहिवासी आहेत. अतिशय क्रुर पद्धतीने कुटुंबियांची हत्या करण्यात आल्यामुळे टांडामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी एका पोलिसांनी 48 वर्षीय संशयित व्यक्तीला अटक केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सदर अपहरण केलेले कुटुंब भारतीय असून ते पंजाबमधील होशियापूर जिल्ह्यातील टांडा येथील ते रहिवासी आहेत. हे कुटुंब अमेरिकेत स्थायिक होते, तिथे त्यांचा स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता अशी माहिती समोर येत आहे. या घटनेत दुर्दैवी मृत्यू पावलेल्यामध्ये आई, वडिल, काका आणि ८ महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. जसदीप सिंह (36 वर्षे), जसदीप यांची पत्नी जसलीन कौर (27 वर्षे), मुलगी अरूही धेरी (आठ महिने) आणि अमनदीप सिंह (39 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी काही माहिती उघड केली आहे. याबाबत बोलताना मर्स्ड काऊंटी शेरिफ म्हणतात, या सर्वांचे मृतदेह मर्स्ड काऊंटी येथे आढळले. त्या अगोदर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या चार जणांचे 3 ऑक्टोबरला दक्षिण हायवे 59 च्या 800 ब्लॉक येथून जबरदस्तीने  अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी एका अपहरण केलेल्या एका संशयित व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी 48 वर्षीय संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.

दरम्यान, या कुटुंबियांची कार सोमवारी जळालेल्या अवस्थेत सापडली, मात्र त्यामध्ये कोणीच नसल्याचे आढळून आले, त्यामुळे कारमधील कुटुंबियांचे अपहरण झाले असावे असा संशय बळावला. त्याचवेळी मृत व्यक्तीपैकी एकाचा एटीएम कार्डचा अपहरणकर्त्याने केला आणि पोलिसांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी ते एटीएम वापरणाऱ्याला लगेचच अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव येशू मॅन्युअल सालगार्डो असे असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्याची चौकशी केली.

अपहरणकर्त्याचे या कृत्यामागे नेमका काय हेतू होता याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपहरणकर्त्याने कोणतीच रक्कम मागितली नाहीत त्यामुळे कारण अजूनही स्पष्ट होत नाही, शिवाय त्या व्यक्तीकडे शस्त्रे असल्यामुळे पोलिसांनी याबाबत खोलवर चौकशी सुरू केली आहे. भिकाऱ्याच्या वेशात एक व्यक्ती या दोघा भावांच्या ऑफिसमध्ये आली आणि बंदुकीच्या धाक दाखवत चार जणांचे अपहरण केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी