31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, पंजाबमधील सर्व 117...

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा नवीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, पंजाबमधील सर्व 117 जागा लढवणार

टीम लय भारी

चंदीगड: आखेर आज पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव आणि चिन्ह लवकरच जाहिर करण्यात येईल असं ते म्हणाले. कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा स्वतः केली. आपला नवाीन पक्ष भाजपासोबत जागावाटप करेल, परंतु अकाली दलासोबत युती करणार नाही, असं कॅप्टन यांनी स्पष्ट केलं (Capt. Amarinder Singh new party will share seats with the BJP).

ते पुढे म्हणाले की, योग्य वेळ आल्यावर त्यांचा पक्ष पंजाबमधील सर्व 117 जागांवर लढेल. “वेळ येईल तेव्हा आम्ही सर्व 117 जागा लढवू, मग ते जागा वाटपातून असो किंवा स्वबळावर,” अमरिंदर सिंग म्हणाले.

Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा नेत्याकडे जाणार ?

Congress : मुंबई महापालिकेत काँग्रेस स्वबळावर लढणार

भाजपाशी युती नाही

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा नवीन पक्ष भाजपासोबत युती करणार नाही पण, भाजपासोबत जागावाटप करेल.

भाजपाला मोठा धक्का; उल्हासनगरमध्ये ओमी कलानी गटाच्या २२ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Live: Amarinder Singh to launch new party; Sidhu calls Captain a ‘loyal CM of BJP’

नवज्योत सिंग सिद्धूंचा टोला

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मागच्या वेळी तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि तेव्हा तुम्ही तुमचे मतदार गमावले. तुम्हाला केवळ 856 मतं मिळाली होती. पंजाबच्या हिताशी तडजोड केल्याबद्दल पंजाबचे लोक पुन्हा तुम्हाला शिक्षा देण्याची वाट पाहत आहेत,” अशी टीका सिद्धू यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी