32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयछगन भुजबळांच्या विरोधात अंजली दमनिया हायकोर्टात जाणार

छगन भुजबळांच्या विरोधात अंजली दमनिया हायकोर्टात जाणार

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाली आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने त्यांना ही क्लीन चीट दिली आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत (Chhagan Bhujbal has got clean chit from the Maharashtra Sadan scam case).

अंजली दमनिया या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भुजबळांना जरी क्लीन चीट मिळाली असली तरी दमनिया यांच्यामुळे अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने छगन भुजबळांसोबतच मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या व माझी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे, यांची नावे या घोटाळ्यातून वगळण्यात आली आहेत.

सर सलामत तो हेल्मेट पचास : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारला फटकारले

दिल्लीत्तील महाराष्ट्र सदन बांधकामात पैशांची अफरातफर करण्याच्या आरोपांवरून भुजबळांची 14 मार्च 2016 रोजी मुंबईतील अर्थ रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षांनी भुजबळांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता.

छगन भुजबळांची पुरग्रस्तांसाठी ‘मोठ्या मदती’ची घोषणा

Maharashtra Sadan scam: NCP minister Chhagan Bhujbal, son discharged by special court

तसेच भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयाने मनी लॉडरिंगच्या प्रकरणात सरकारला 880 कोटी रुपयांचा फटका बसवल्याचा आरोप आहे. परंतु सध्या त्यांच्यावर एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी