33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयकाँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार, नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका

काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार, नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका

टीम लय भारी

मुंबई :- राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि सत्ताधारी असा वाद आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही अशी टीका वारंवार भाजपकडून करण्यात आली होती. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे (Congress will contest local body elections on its own, says Congress state president Nana Patole).

तीन चाकी हे सरकार टिकणार नाही अशी टीका वारंवार भाजपकडून करण्यात आली. यात महाविकास आघाडीमध्ये अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे समोर आले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये (Elections) हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. अशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे(Congress will contest local body elections on its own, says Congress state president Nana Patole).

प्रियांका गांधींची नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांत टीका

प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्याची वेळ-आचार्य प्रमोद कृष्णन

यावेळी बोलताना काँग्रेस (Congress) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) आणि विधानसभा निवडणुका (Elections) स्वबळावर लढेल असे नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आघाडी बिघाडी होईल का अशा चर्चांना उधाण आले आहे.

खरंतर, राज्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत. पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठा वाद सुरू असल्याची माहिती समोर आली होती. महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस (Congress) बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.

Groupism in Congress Will Not Be Tolerated, Says Party Chief Nana Patole

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसने (Congress) ही टोकाची भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे काँग्रेसमधील (Congress) वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पदोन्नतीतील आरक्षणावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार यावर महाविकास आघाडी सरकार टिकून असल्याची चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर सरकार टिकते का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी