32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयगायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका आणि बॉलिवूडची सूपर सिंगर वैशाली माडे हिने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थित वैशाली माडेने पक्ष प्रवेश केला आहे (Vaishali Made has joined the party).

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तीने घड्याळ हाती घेतले. त्यामुळे, आता वैशाली माडेचा (Vaishali Made) राजकारणात सूर लागणार आहे. तिच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वैशाली माडेचे (Vaishali Made) स्वागत केले आहे. मंत्री धनंजय मुंडेंनीही ट्विट करुन तिचे स्वागत केले आहे.

काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार, नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका

लसींच्या तुटवड्यावरुन ममता बॅनर्जीचा मोदींवर निशाणा

Gautam Gambhir’s foundation illegally stocked Covid medicine, Delhi drug controller tells HC

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा (Vaishali Made) पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर, आज वैशाली माडेने (Vaishali Made) अधिकृतपणे राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्विकारले आहे. यावेळी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोण आहे वैशाली माडे?

वैशाली माडे (Vaishali Made) ही विदर्भाच्या मूळ हिंगणाघाट येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी असून हिंदी आणि मराठी भाषेतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिने गायलेले गाणे प्रचंड गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच तिने ‘कलंक’ या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ हे ही गाणे गायले आहे. मराठी चित्रपटांतही तिने अनेक गाणी गायली आहेत. ‘सारेगमप’ या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशाली माडेला (Vaishali Made) हिंदी सारेगमप या शोची देखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. दरम्यान, वैशाली माडे (Vaishali Made) ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी