31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रCorona : शेतक-यांच्या अंगणात सदाभाऊंचे अनोखे आंदोलन

Corona : शेतक-यांच्या अंगणात सदाभाऊंचे अनोखे आंदोलन

टीम लय भारी

इस्लामपूर : ‘कोरोनाचा (Corona Virus) वाढतोय पारा म्हणुनच करा शेतक-यांचा सातबारा कोरा’, असे म्हणत शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विवध ठिकाणी शेतकरी आंदोलन करण्यात आले.

‘माझ अंगण हेच रणांगण’ या आंदोलनाच्या माध्यमातून शेतक-यांच्या विवध प्रलंबित प्रश्नांवरुन खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून खोत यांनी हे आंदोलन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उभ्या शेतातील माल आधीच वाया गेला आहे. आता पुढच्या खरीप हंगामात पीक कसे घ्यायचे यासह शेतक-यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. शेतक-यांच्या या विविध प्रश्नांना घेऊन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारी राज्यातील २२ जिल्ह्यात आंदोलन केले. शेतक-यांच्या आंदोलनात गावातील ग्रामस्थांनीही सोशल डिस्टन्स पाळत सहभाग घेतला. संचारबंदीतील या पहिल्या राज्यव्यापी अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यात चांगलीच रंगली आहे.

कोरोनाचा वाढतोय पारा म्हणुनच करा शेतक-यांचा सातबारा कोरा, शेतीपंपाचे वीजबील माफ करा, शेतक-यांच्या ऊसाची एफ.आर.पी. पुर्ण करा, आधारभुत किमतीने शेतक-यांचा शेतमाल खरेदी करा अन्यथा प्रति ‍क्विंटल १ हजार रुपये अनुदान द्या, दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या, कोरोनाच्या कहरीने ज्या शेतक-यांचा भाजीपाला, फळे, फुले शेतात सडुन गेली आहेत आणि जात आहेत त्यांचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्या, शेतमजुर व इतर कामगारांमध्ये ज्यांचे रेशनकार्ड नाही त्यांना त्वरीत धान्य द्या व खर्चासाठी २ हजार रुपयांची सोय करा, या वर्षी सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना फी मध्ये सवलत द्या, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

आंदोलनाचे वेळी वाळवा पंचायत समीतीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडीक, सदाभाऊ खोत यांचे परीवारातील त्यांची आई रत्नाबाई खोत, पत्नी सुमन खोत, मुलगा सागर खोत व मरळनाथपुर गावातील जयकर कचरे, रवींद्र खोत, राजु खोत व इतर नागरीक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी