31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर? : इकबाल सिंह चहल

मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर? : इकबाल सिंह चहल

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भाव झापाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. 1 मेपासून 18 ते 45 वयोगटातील लसीकरण सुरु होणार आहे. अशावेळी आता मुंबईत इतक्यात 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस (vaccination) देण्यात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. (BMC says it’s not possible to start vaccination to 18 above peoples immediately).

मुंबईत कोरोना लसींचा मर्यादित साठा उपलब्ध आहे (Mumbai has limited stock of corona vaccines). त्यामुळे 18 वर्षांवरील तरुणांना इतक्यात कोरोना लस देता येणार नाही, अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतली आहे. आयुक्त यासंदर्भात राज्य सरकारला पत्रही लिहणार असल्याचे समजते.

निलम गोऱ्हे यांच्यावर ‘महाविकास आघाडी’चे नेते नाराज

‘गोंदवलेकर महाराज ट्रस्ट’ने अखेर रूग्णालय सरकारकडे सोपविले, पण अवघ्या 30 खाटांचे

1 मेपासून लगेच 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यास कोरोना लसींचा साठा कमी पडू शकतो (Stocks of corona vaccines may be depleted if immunization of citizens above 18 years of age begins immediately from May 1). तसेच त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असे इकबाल सिंह चहल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल.

राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. परंतु, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपर्यंत राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे.

देशातील चार बिगरभाजप राज्यांचा 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास नकार

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोव्हिड लस (Covid vaccine) देण्याची परवानगी दिली आहे. परंतु, आता देशातील चार बिगरभाजप राज्यांनी या निर्णयाशी असहमती दर्शविली आहे. आमच्याकडे कोरोना लसींचा (Corona vaccines) तुटवडा आहे. त्यामुळे आम्ही 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करु शकत नाही, असे या राज्यांनी केंद्राला कळवले आहे.

By hiding the real number of Covid-19 cases and deaths, some Indian states are disempowering people

या चार राज्यांमध्ये पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ आणि झारखंडचा समावेश आहे. 1 मेपासून 18 ते 45 या नव्या वयोगटासाठी लसीकरण सुरु होणार असल्याने बहुतांश राज्यांनी युद्धपातळीवर तयारी सुरु केली आहे. या लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात होईल. परंतु, चार बिगरभाजप राज्यांनी असमर्थता दर्शविल्याने मोदी सरकारच्या देशव्यापी मोहिमेत अडथळे येण्याची शक्यता आहे.

 

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी