29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयरेमडिसीवर वादावर सुजय विखे-पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

रेमडिसीवर वादावर सुजय विखे-पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई :-  नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिल्लीहून रेमडिसीवर इंजेक्शन (Remdesivier Injecation) घेऊन आल्यामुळे वादात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) आता प्रतिस्पर्ध्यांविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले. (BJP MP Sujay Vikhe Patil explanation on remdesivir injection purchase controversy)

देवेंद्र फडणवीसाच्या वक्तव्यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो: रोहित पवार

सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) मंगळवारी अहदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करुन आणल्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. (There is talk of increasing the difficulty of Sujay Vikhe-Patil).

मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर? : इकबाल सिंह चहल

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील मंगळवारी प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी म्हटले की, मी किती रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करुन आणली याचा उल्लेख केलेला नाही. मला यावर राजकारण करायचे नाही. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले (Sujay Vikhe-Patil said that no one from outside the district is bound to answer).

‘नगर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने प्रश्न उपस्थित केला का?’

नगर जिल्ह्यात 12 आमदार आहेत. एकाही आमदाराने या सगळ्याविषयी फसवेगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे का? त्यांना हा स्टेट वाटत असेल तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्याला सर्व पुरावे देईन.

Modi is a ‘super spreader’ of coronavirus, says IMA vice president

माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून आमचे कुटुंब जिल्ह्यात कार्यरत आहे. जनतेने कधीही आमची साथ सोडलेली नाही. मी कारवाईला घाबरत नाही. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले (We have all the evidence, said Sujay Vikhe-Patil).

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी