32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रिकेटऑस्ट्रेलियाला नमवून भारताने केले अनोखे विक्रम

ऑस्ट्रेलियाला नमवून भारताने केले अनोखे विक्रम

रविवारी, 24 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवला. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळामुळे तसेच कर्णधार के एल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचा डोंगर उभारला. नंतर गोलंदाजीतही भारतीय फिरकीपातूनणी अफलातून खेळाचे प्रदर्शन करत 217 धावांत ऑस्ट्रेलियाला गुंडाळले. हा सामना जिंकून भारताने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळे विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यामुळे विश्वचषकासाठी तयारी करणाऱ्या भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे.

भारतीय कर्णधार के एल राहुल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा लवकर माघारी परतल्याने सलामीवीर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. शुभमन गिलने 97 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 90 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 105 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार के एल राहुलने 38 चेंडूत 52 धावा केल्या. त्यासोबतच, सूर्यकुमार यादवने केलेल्या तडाखेबाज खेळीने भारताला 399 धावांचा आकडा गाठता आला. सूर्यकुमारने तूफान फटकेबाजी करत 37 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या.

त्यानंतर, 399 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणण्याचे काम भारतीय गोलंदाजांनी केले. प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पहिल्याच षटकात मॅथ्यु शॉर्ट आणि स्टिव स्मिथ यांना बाद केले. रविचंद्रन अश्विन याने आधी मारनस लबुशेन (27) याला आणि नंतर एकाच षटकात डेव्हिड वॉर्नर (53) व जोस इंग्लिस (6) यांना माघारी पाठवले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या रवींद्र जाडेजा नेही 3 विकेट्स मिळवत अॅ लेक्स कॅरी (14), शॉन अबॉट (54) आणि अॅडम झंपा {5) यांना तंबूत पाठवले. कॅमेरून ग्रीन ला किशनने धावचीत केले तर जोश हेजालवूडच्या स्वरूपात मोहम्मद शमिला विकेट मिळाली. 28.2 षटकांत 217 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला.


दुसरी वन डे जिंकत भारताने केले तब्बल पाच विक्रम आपल्या नावावर

भारताने इंदौर मधील होळकर स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवून एक-दोन नव्हे तर तब्बल पाच अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1) मध्य प्रदेशमधील इंदौरच्या होळकर स्टेडियमवर भारताचा अजिंक्य राहण्याचा विक्रम अबाधित राहिला आहे. भारताने आतापर्यंत या स्टेडियमवर ७ वन डे खेळल्या असून सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. होळकर स्टेडियमवर भारताचा विजयाचा दर १०० टक्के कायम आहे.

2) शुबमन गिलने या सामन्यात शानदार शतक झळकावत ९७ चेंडूत १०४ धावा केल्या.एकूण ३५ वन डे डावांत त्याच्या १,९१७ धावा झाल्या असून पहिल्या ३५ वन डे डावांत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम गिलने आपल्या नावे केला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला याच्या नावावर असलेल्या १,८४४ धावांचा विक्रम गिलने मोडला.

हे ही वाचा 

भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडेमध्ये शमीचा जलवा, ऑसींसमोर केला नवा विक्रम

वर्ल्डकपआधी भारताची अग्निपरीक्षा! आजपासून बलाढ्य ऑस्ट्रेलियासोबत रंगणार वन-डे मालिका

भारत विरुद्ध पाक आज पुन्हा होणाऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट?

3) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने 50 षटकांत 399 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

4) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने अजून एक अनोखा विक्रम आपल्या नवे करत वन डे प्रकारात 3000 षटकार मारणारा भारत पहिला संघ ठरला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 18 षटकार लगावून हा विक्रम आपल्या नावे केला.

5) सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची यथेच्छ धुलाई करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. सूर्यकुमारने तूफान फटकेबाजी करत 37 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकनारा तो पहिला भारतीय बनला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताने जिंकली असून तिसरी आणि शेवटची वन डे राजकोट येथे 27 सप्टेंबरला रंगणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी