31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रपत्रकारांसाठी भाजपचं 'चहापाणी' तंत्र

पत्रकारांसाठी भाजपचं ‘चहापाणी’ तंत्र

तंत्रमंत्रवर विश्वास असणाऱ्या भाजपने देशात अनेक साधू, महाराज मंडळींना आमदार, खासदार आणि मुख्यमंत्रीही केले आहे. त्यामुळे तंत्र विद्यामध्ये भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही. अशा भाजपचे राज्याचे म्होरके, नागपूरनिवासी, प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसाठी  ‘चहापाणी’ तंत्र आणलेले आहे. ‘भाजपा विरोधातील बातम्या दाबण्यासाठी  हे तंत्र’ वापरण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दिल्या असून त्याचीच चर्चा सध्या राज्यातील पत्रकारांमध्ये आहे.

राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सरकार आहे. येत्या काही महिन्यात आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत. विविध सर्वेमधून राज्यातील सरकारविरोधात जनमत असताना भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली आहे. असे असताना, ‘पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असे नवे संवाद तंत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी अहमदनगर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत है पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील. त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला
चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या. भाजपसंदर्भात सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या,’ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
हे सुद्धा वाचा 

अजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा
गणपती, गणेश चतुर्थी आणि ऐतिहासिक संदर्भ
गणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !

केंद्रात २०१४ पासून भाजपचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह देशात भाजपच्या विचारांचे सरकार असावे यासाठी मोदी-शहा जंगजंग पछाडत आहे. यातूनच कॉँग्रेससह विरोधी पक्षांचे मध्य प्रदेशसह अनेक सरकारे भाजपने पाडली होती. २०१९ मध्ये राज्यात भाजपला १०५ जागा मिळाल्या. पण शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याने भाजपला सहज सरकार बनवणे कठीण गेले. दरम्यानच्या काळात अजित पवार यांना गळला लावून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ८० तासाचे सरकार चालवले. या सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. पण हे सरकार अल्पजीवी ठरले.नंतर राज्यात अडीच वर्ष शिवसेना- दोन्ही कॉँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

राज्यातील सत्तासंघर्ष पाहता, राज्य सरकारला आगामी निवडणुका जड जाणार आहेत. यासाठी भाजपने आपला मीडिया सेल वॉर रूममध्ये रूपांतरित केला आहे. शिवाय आमदार, खासदार मंडळींना आपल्या आपल्या मतदारसंघात जाण्याच्या शिवाय केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय जनतेत पोहचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बावनकुळे हे रविवार अहमदनगरमध्ये आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी