29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका !

पंकजा मुंडे यांना केंद्राचा झटका !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जात आहे. पंकजा मुंडे यांनी राज्यात नुकतीच शिवशक्ति परिक्रमा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेतून त्यांनी राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याच्या चर्चा रंगत असतानाच केंद्राकडून त्यांना मोठा झटका बसला आह. त्यांच्या नेतृत्वाखीलल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता केंद्रीय जीएसटी विभागाने जप्त केली आहे.

सन 2014 साली राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यातच त्यांचा चिक्की घोटाळा देखील गाजला. त्यामुळे पंकजा मुंडे बॅकफुटवर गेल्या होत्या. दरम्यान सन 2019 साली पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र विधान परिषदेवर देखील त्यांना संधी मिळाली नाही. दुसरीकडे भाजपने राष्ट्रीय पातळीवर सचिवपद देण्यात आले.

मात्र राज्यातील राजकारणातून पंकजा मुंडे यांना दूर करण्याचे प्रयत्न होत असल्याची कार्यकर्त्यांची धारणा होती. पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळत नसल्याने कार्यकर्ते सभांमध्ये आक्रमक होत असत. त्यातच नुकतीच पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ति परिक्रमा यात्रा काढून राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी राज्यात कार्यकर्ते, समर्थकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान पंकजा मुंडे याच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली आहे. मागील एप्रिल महिन्यात जीएसटी आयुक्तालयाने कारखान्यावर छापे टाकले होते. त्यानंतर आज कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कारखान्याने बेकायदा 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणी जीएसटी आयुक्तालयाकडून चौकशी सुरु होती.

हे सुद्धा वाचा 
ऑस्ट्रेलियाला नमवून भारताने केले अनोखे विक्रम
पत्रकारांसाठी भाजपचं ‘चहापाणी’ तंत्र
अजित पवार गटांकडून ऑफर्स येत आहेत; एकनाथ खडसे यांचा दावा

दरम्यान केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची कोणती मालमत्ता जप्त केली आहे, याची यादी कारखान्याच्या गेटवर लावली आहे. या यादीनुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि काही मशिन्स जप्त करण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी