क्राईम

अभिनेत्री ख्रिसन परेरा हिला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवलं

सडक 2 या चित्रपटाची अभिनेत्री क्रिसॅन‌ परेरा हि अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात अटकेत आहे. तिला विनाकारण अडकवल्या बद्दल गुन्हे शाखेने अँथोनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बोभाटे या दोघांना अटक केली आहे. पूर्व वैमानस्यातून हे केल्याचं म्हटलं जातं आहे.आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.

नुकताच प्रदर्शित झालेल्या सडक २ चित्रपटात अभिनेत्री क्रिसॅन‌ला परेराला ही महत्वाच्या भूमिकेत होती.तिच्या कामाची चर्चा ही झाली.या क्रिसॅन‌ परेरा हिला अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी शारजा विमानतळावर अटक करण्यात आली आहे.ती सध्या शारजा इथल्या जेल मध्ये आहे.मात्र, तिचा कोणताही संबध अंमली पदार्थाच्या तस्करीशी नाही.तिला फसवण्यात आल्याचं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. एक एप्रिल रोजी वेबसिरिजच्या कामासाठी क्रिसॅन‌ शारजाला जाणार होती. यावेळी आरोपी अनथोनी याने तिला एक ट्रॉफी दिली.त्या ट्रॉफी मध्ये गांजा हा अंमली पदार्थ लपवला होता.क्रिसॅन‌ शारजा विमानतळ येथे पोहचल्यावर तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावेळी तिच्या जवळच्या ट्रॉफी मध्ये गांजा सापडला. यामुळे तिला तिथल्या पोलिसांनी अटक केली. तिला सध्या जेल मध्ये ठेवण्यात आलं आहे.

प्रत्यक्षात गांजाशी क्रिसन हिचा काही संबंध नाही.आरोपी अँथोनी याच क्रिसनच्या आईशी वाद आहे.या पूर्ववैमनस्यातून अँथोनीने क्रिसॅन‌ला अडकवल्याचा पोलिसांचा दावा आहे.क्रिसॅन‌ ला शारजा येथे अटक केल्यानंतर तिला ट्रॉफी देणाऱ्या अँथोनी यांच्या विरोधात क्रिसन हिच्या आईने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.यानंतर हा तपास मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट 10 कडे देण्यात आला.युनिट 10च्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून आज अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे यांना अटक केली.कारण यांनीच क्रिशन हिला ट्रॉफी दिली होती.त्यात गांजा लपवला होता.याच मुद्यांच्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

ईडीने केली 91 कोटींची मालमत्ता जप्त

खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!

या आधी देखील बोरीवली मधील एका डी जेला अश्याच प्रकारे पूर्व वैमनस्यातून अँथोनी याने अडकवल होत.क्लेटन रॉड्रिग्ज नावाचा डी जे देखील शारजा पोलिसांच्या ताब्यात आहे. आणखीही लोकांना अश्याच प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. तर क्रिसॅन‌आणि रोड्रिग्ज याच्या सुटकेसाठी मुंबई पोलीस प्रयत्न करणार आहेत.

सुधाकर काश्यप

Recent Posts

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

3 mins ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

16 mins ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

38 mins ago

नरेंद्र मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी ठरणार दिवास्वप्नच

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभेत देवळा तालुक्यात कांदाफेक…

50 mins ago

नंदूरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

बारामती मतदारसंघातील मतदानानंतर पराजयाच्या भीतीने शरद पवारांनी आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू केली…

2 hours ago

अरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका…

2 hours ago