33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमअविनाश भोसले यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

अविनाश भोसले यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले आणि संजय छाबरिया दोघांची डिफॉल्ट जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.त्यांनी विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे.त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

ईडीने दोघांच्या विरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.हे दोघे सध्या जेल मध्ये आहेत.या दोघांनी अनेकदा जामिनासाठी अर्ज केला होता.मात्र,त्यांचे अर्ज फेटाळण्यात आलेत. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला.यावेळी आरोपीला उपलब्ध स्वयंचलित जामिनाच्या (डिफॉल्ट जामीन) हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्देश दिलेत.सर्वोच्च न्यायालयाचा याच निर्देशाचा आधार घेत अविनाश भोसले आणि संजय छाबरिया या दोघांनी आज तातडीने डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला.आज प्राथमिक सुनावणी दरम्यान ईडीने जामीन अर्जावर आक्षेप घेतला.

हे सुद्धा वाचा

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

फ्लॅट धारकांची फसवणूक, निर्मल लाईफ स्टाईलच्या मालकांना अटक

दिल्लीश्वरांच्या मर्जीमुळे मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी ?

मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला.त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची ईडीने कोर्टाला विनंती केली.आज सुनावणी अपूर्ण झाली.त्यामुळे उद्या पुन्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.आरोपी पक्ष आणि ईडीचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालय दोघांच्या डिफॉल्ट जामिन अर्जावर निर्णय देणारं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी