29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना...

शरद पवार यांनी लगेच भाकरी फिरविली, लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांना मिळ्णार संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाकरी फिरवण्याचे संकेत दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची प्रचिती आली आहे. पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आपला शब्द पाळत शरद पवार यांनी राज्य विधीमंडळ लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाकरी फिरवण्याचे संकेत दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याची प्रचिती आली आहे. पक्ष संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आपला शब्द पाळत शरद पवार यांनी राज्य विधीमंडळ लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे.

या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील भल्याभल्या नेत्यांनी फिल्डींग लावली असताना खुद्द शरद पवार यांनी रोहित पवार यांचे नाव सुचविल्यामुळे राष्ट्रवादीत खरोखरच भाकरी फिरली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संवाद कार्यक्रमात शरद पवार यांनी बुधवारी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते.

पक्षात नवीन नेतृत्व निर्माण करायचे असेल तर तरुणांना विविध पदांवर काम करण्याची संधी देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी राज्य विधिमंडळातील लोकलेखा समितीच्या (पीएसी) अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांचे नाव सुचविण्यात आले.

लोकलेखा समिती ही विधिमंडळातील अनेक समित्यांपैकी महत्त्वपूर्ण अशी एक समिती आहे. या समितीमध्ये विधानसभेचे २० आणि विधानपरिषदेचे ५ सदस्य आहेत. पीएसी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालांची छानणी या समितीकडून केली जाते. या समितीवर विरोधी पक्षातील आमदारांची नियुक्ती केली जाते.

विधानपरिषदेवर नुकतेच निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे. आता शरद पवार यांनी शिफारस केल्यानुसार रोहित पवार यांना लोकलेखा समितीवर काम करण्याची संधी मिळाल्यास राष्ट्रवादीत तरुणांचे नेतृत्व पुढे आणण्यास सुरुवात झाली असल्याचे मानले जाणार आहे.

हे सुध्दा वाचा :

भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे, शरद पवारांनी दिले पक्षातील नेतृत्व बदलाचे संकेत..!

दिल्लीश्वरांच्या मर्जीमुळे मराठा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी ?

बारसू रिफायनरी प्रकल्प: ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल

यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला असता, लोकलेखा समितीवर नियुक्तीसाठी शरद पवार यांनी माझ्या नावाची शिफारस केल्याबाबत मला काहीही माहिती नाही. मात्र, पक्षाने माझ्या खांद्यावर ही जबाबदारी टाकल्यास ती समर्थपणे सांभाळण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळत असेल तर ही अतिशय आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी