31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईमनाशिकमधील तो खून प्रेमत्रिकोणातून : दोन आरोपी अटकेत

नाशिकमधील तो खून प्रेमत्रिकोणातून : दोन आरोपी अटकेत

कामगारनगर परिसरात तीन दिवसांपूर्वी गळा चिरून झालेल्या २२ वर्षीय हॉटेल कामगाराच्या खूनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. नेपाळस्थित असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. दरम्यान, संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.ईश्वर शेर सार्की (वय २०) व प्रकाश गोविंदबहादूर शेटी (वय ४२) दोघेही मुळ रा. नेपाळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहे. (Nashik murder out of love triangle: Two accused arrested)

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कामगारनगर रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारील कौशल्य व्हिला इमारतीच्या गच्चीवर रविवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास महेंद्र सार्की (वय २२, मुळ रा. नेपाळ ) या हॉटेल कामगाराची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तळ ठोकत तपास चक्रे गतिमान केली. सातपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ४८ तासाच्या आत काही संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच संशयित ईश्वर व प्रकाश यांनी खुनाची कबुकी दिली. नेपाळ स्थित असलेल्या एका तरुणीशी मयत महेंद्रचे प्रेम प्रकरण सुरु होते. महेंद्र त्या मुलीसोबत तासंतास बोलत असे. दरम्यान, संशयित आरोपी ईश्वरचेही त्या मुलीवर प्रेम जडले होते. तिच्यासोबत ईश्वरने अनेकदा फोनद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र मयत महेंद्र नेहमी तिच्याशी बोलत असल्याचे ईश्वरला खटकत होते. अखेर ईश्वरने महेंद्रचा काटा काढण्याचे ठरवले.

दरम्यान, नेहमीप्रमाणे मयत महेंद्र मुली सोबत गच्चीवर बोलत असल्याचे बघून संशयित ईश्वरने त्याची गळा चिरून हत्या केली. यासाठी त्याला संशयित प्रकाश शेट्टी यांने मदत केली. दोघांवरही भादवी कलम 302 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, गुन्हे शाखा युनिट एक व दोनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामगिरी फत्ते केली.

आत्महत्येचा केला बनाव
संशयित आरोपी ईश्वर सार्की याने घरातील सुरीच्या साह्याने मयत महेंद्र सार्की याचा गच्चीवर गळा चिरून खाली फेकले. त्यानंतर आपल्या घरात जावून इतर मित्रांना न समजता शांत झोपला. त्यावेळी त्याने आपला साथीदार प्रकाश शेट्टी याला आपण घरात गेल्यावर बाहेरून दरवाजाची कडी लावण्यास सांगितले. जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासवता येईल. मात्र पोलीस तपासात आत्महत्येचा बनाव उघड झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी